|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » विविधा » या गावात पडतो चक्क ‘सोन्याचा पाऊस’

या गावात पडतो चक्क ‘सोन्याचा पाऊस’ 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

आजपर्यंत पैशांचे पाऊस पडलेले तुम्ही ऐकले असेलच पण कधी सोन्याचा पाऊस पडलेले पाहिले किंवा ऐकले आहे का? हे ऐकायला जरी वेगळे वाटत असेल तरी प्रत्यक्षात हे खरे असून कोल्हापूर जिल्हय़ातील बीड गावात सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे.

कोल्हापूरपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर करवीर तालुक्यात बीड हे गाव आहे. या गावाने एक वेगळेपण टिकून ठेवले आहे. कारण या गावात परमेश्वर सोन्याचा पाऊस पाडतो, असे या गावातील लोक सांगतात.

या गावात कल्लेशवचा माळ आणि बीड शेड परिसरात डाळीच्या आकाराची सोन्याजी छोटी नाणी सापडतात. त्यामुळे या गावावर सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडतो, ही आख्यायिका आहे. गावातील अनेक घरातील देव्हाऱयात ही नाणी पुजली आहेत. शेतात काम करत असताना, रस्त्याने जाताने इतकचं काय जनावरांच्या शेणावर आणि शेतीच्या पानावरही अनेक लोकांना नक्षीकाम केलेले सोन्याचे छोटे मोठे तुकडे यापूर्वी सापडले आहेत. ते आजही सापडतात. ग्रामस्थांनी मिळालेले सोने आजही जपून ठेवले आहे.

Related posts: