|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » विजेवर चालणाऱया वाहनांच्या निर्मितीची गरज : गिते

विजेवर चालणाऱया वाहनांच्या निर्मितीची गरज : गिते 

ऑनलाईन टीम / पुणे :

भारतातील वाढते प्रदुषण पाहता पेट्रोल, डिझेल, यासारख्या इंधनांवर चालणाऱया वाहनांशिवाय आता 100 टक्के विजेवर चालणाऱया वाहनांची निर्मिती करण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी व्यक्त केले.

एआरएआय आयोजित ‘सियाट 2017’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, भारतात पेट्रोल, डिझेल, इथेनॉल, हायड्रोजन तसेच सौर उर्जेवर चालणाऱया वाहनांची निर्मिती करण्यात आली. परंतु भारतातील वाढते प्रदूषण पाहता 100 टक्के विजेवर चालणाऱया वाहनांची निर्मिती होणे आवश्यक आहे. वेळ बदत आहे, त्यानुसार आपणालाही बदलायला हवे.

Related posts: