|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मंगल स्वरांच्या निनादात 54 दांपत्य विवाहबंधनात अडकले

मंगल स्वरांच्या निनादात 54 दांपत्य विवाहबंधनात अडकले 

पंढरपूर / प्रतिनिधी

सनई चौघडयांच्या निनादांमधे बौध्द , मुस्लिम आ†िण हिंदू धर्माच्या रितीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 54 दांपत्य हे विवाहबंधनात अडकले आहेत. यावेळी सारा परिसरच हा मंगल स्वरांच्या निनादात दुमदुमून गेले आहेत.

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळयांचे आयोजन करण्यात आले होते. यामधे 108 वधु5 वर हे विवाहबंधनात अडकले. यावेळी साधारपणे 25 हजारांहून अधिक व-हाडी बाजार समितीच्या आवारात आज आले होते.

  सदरच्या विवाह सोहळयांसाठी मोठया प्रमाणावर मांडव हा उभा करण्यात आला होता. यामधे कर्मयोगी प्रतिष्ठानकडून विविध धर्माच्या धर्मगुरंना बोलावून सदरचे विवाह हे करण्यात आले होते. यावेळी बौध्द धर्मीयांच्या परंपरेप्रमाणेही विवाह करण्यात आले. यासाठी बौध्द भिक्षुक यांनी नव वधू वरांना दिक्षा दिला. यावेळी सुंदर आणि सुबक अशी गौतम बुध्दांची मुर्ती ठेवण्यात आली होती. यावेळीही या वधुवरांनी अभिवादन केले होते. साधारणपणे सव्वा सहांच्या सुमारास या विवाह सोहळयांची सुरूवात करण्यात आली होती.

त्यानंतर मुस्लिम धर्माप्रमाणे मुस्लिम समाजांचे धर्मगुरू यांच्या कडून धार्मिक रिती पूर्ण करून मुस्लिम धर्मीय वधू – वरांचे देखिल विवाह लावण्यात आले होते. त्यानंतर सहा वाजून 40 मिनिटांच्या आसपास हिंदू धर्माच्या रितीप्रमाणे नव वधू वरांचे विवाह लावण्यात आले. यावेळी मंगल स्वरात मंगलआष्टकांचा गजर होउन मोठया प्रमाणावर हिंदू धर्मीयांचे विवाह लावण्यात आले.

या विवाह सोहळयामधे 39 हिंदू धर्मीयांचे 12 बौध्द धर्मीयांचे आणि 3 मुस्लिम धर्मीयांचे विवाह लावण्यात आलेले आहेत. सदरच्या तीनही धर्मियांसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था उभा करून हा विवाह सोहळा संपन्न करण्यात आला.

सदरच्या विवाह सोहळयांसाठी सुमारे तीन एकर मैदानावर मांडव उभा करण्यात आला होता. यामधे दोन्ही बाजूला मोठया प्रमाणावर रॅम्प उभा करून विवाह सोहळयांची तयारी करण्यात आली होती. त्यानंतर सदरच्या रॅम्पवर वधू – वरांची आणि त्यांच्या संबधित कुंटुबाची देखिल नावे लिहण्यात आली होती. त्यानुसार अत्यंत शिसतबध्द रित्या सदरचा विवाह सोहळा हा पार पडला.

   यावेळी सदरच्या मांडवाच्या पाठींमागच्या बाजूस संबधित 108 वधू आणि वर यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभा करण्यात आला होता. यामधे देखिल प्रत्येक कक्षाला संबधित वधूचे अथवा वरांच्या नावांचा फ्ढलक लावून देण्यात आला होता. त्यामुळे विवाहाप्रसंगी असणारे वधू – वरांचे कक्षही स्वतंत्रच पहील्यांदाच सामुदायिक विवाह सोहळयामधे पहावयास मिळाले.

    वधू वरांच्या कक्षांच्य सोबतच सर्वात महत्वांचे या विवाह सोहळयांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तो म्हणजे भोजन कक्ष होय. या भोजन कक्षांमधे मोठया प्रमाणावर एका वेळेस पाच हजार लोक जेवण करू शकतील. अशा पध्दतीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी आलेल्या सर्व व-हाडी मंडळींना पुरी , मिक्स व्हेज , मटकी , लाडू , पुलाव आदि पक्वांनाची मेजवानी लाभली गेली.

  सदरच्या विवाह सोहळयामधे उपस्थित वधू – वरांना आशीर्वाद देण्यासाठी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत परिचारक , सीमाताई परिचारक। उमेश परिचारक , विनया परिचारक , प्रभाकर परिचारक , आरती परिचारक , प्रणव परिचारक , नगराध्यक्षा सौ. साधना भोसले तसेच कर्मयोगी प्रतिष्ठान आणि पांडुरंग परिवारांच्या विविध संस्थाचे पदाधिकारी कर्मचारी मोठया संख्येने तसेच शहर आणि तालुक्यातीलही परिचारक प्रेंमीही यावेळी उपस्थित असलेले †िदसून आले.

Related posts: