|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » मनोरंजन » हम गया नही जिंदा है महानाटय़ रंगमंचावर

हम गया नही जिंदा है महानाटय़ रंगमंचावर 

श्री स्वामी समर्थांच्या लीलांवर आधारित हम गया नही जिंदा है.. हे अभूतपूर्व महानाटय़ सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत प्रथमच सादर होत आहे. लेखन, संयोजन, गीत, संगीत, दिग्दर्शन दास दिगंबर यांचे असून स्वामी समर्थांची भूमिकाही  दास दिगंबर साकारत आहेत. 2400 चौरस फुटांचा भव्य रंगमंच आणि 125 कलाकारांचा सहभाग असलेले हे महानाटय़ जाणता राजा या महानाटय़ाहून भव्य दिव्य असून स्वामी समर्थांवरील या महानाटय़ाचा आनंद मुंबईकरांना घेता येणार आहे. गोपीनाथ सावकार स्मफती विश्वस्त निधी आयोजित या महानाटय़ाचे मुंबईतील प्रयोग 28 आणि 29 जानेवारी रोजी माहीम पश्चिम बस डेपोच्या बाजूला असलेल्या मच्छिमार कॉलनी जवळील मफदूंगाचार्य नारायणराव कोळी मैदानात सायंकाळी 6.15 वाजता दोन्ही दिवस होणार आहेत.

 गोपीनाथ सावकार विश्वस्त निधीचे सुभाष सराफ यांनी सांगितले की, हम गया नही जिंदा है… हे महानाटय़ वेगळे असून संगीतमय आहे. यात गोंधळ, पालखी, वासुदेव, जोगवा, कव्वाली, पोवाडा, खेळे नफत्य, जाखडी नफत्य अशा प्रकारच्या संगीत आणि नफत्य या प्रकारांबरोबरच दिपवणारी प्रकाशयोजना अद्भुत असे ट्रिकसीन्स आहेत. स्वामी जे आयुष्य जगले तेही अद्भुत होते, दास दिगंबर यांनी ज्याप्रकारे या महानाटय़ातून मांडलाय ती एक वेगळी अनुभूती आहे. आम्हाला हे महानाटय़ मुंबईत प्रथम आयोजित करण्याची संधी मिळाली हेही आमचे भाग्य समजतो. या महानाटय़ाबाबत माहिती देताना दास दिगंबर म्हणाले, स्वामींनी सांगितले होते की, अहिंसा वफत्तीचे आचरण करा, जीवजंतूंवर प्रेम करा, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. स्वत:चे चोचले पुरवू नका. जात पंथ विरहित व्हा. धर्माच्या नावाने वाद घालून एकमेकांपासून दूर जाऊ नका. स्वामी नामाचा प्रसारनामी सामर्थ्य कळावे, त्यांचा उपदेश प्रचार करावा हा मुख्य उद्देश आहे. यात माझे स्वत:चे असे काही नाही. लेखन मी केले असले तरी स्वामीकृपेमुळेच हा प्रामाणिक प्रयत्न करू शकलो.

यात रत्नागिरीतील आमच्या गावखडी गावचे कलाकार, चिपळूण, मुंबईचे कलाकार आहेत सगळे स्वामी भक्त आहेत. नाटकाबाबत अधिक माहिती देताना श्रीयांश कानविंदे यांनी सांगितले की, सुरुवातीला सात तासाचे हे महानाटय़ होते, ते तीन तासात बसवले आहे, त्यात दोन मध्यंतर आहेत. गावखडीहून नेपथ्यकार रघुवीर तळाशिलकरांनी बनवलेला नेपथ्य येईल आणि आमचे कलाकारच हे नेपथ्य दोन तासात लावतील. हे महानाटय़ पाहणे ही एक आनंददायी पर्वणीच असणार आहे. या महानाटय़ातून मिळणारे पैसे हे स्वामी प्रसारासाठी वापरले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 22 जानेवारीपासून बोरिवलीत प्रबोधनकार ठाकरे नाटय़गफह आणि विलेपार्ले येथे दीनानाथ मंगेशकर नाटय़गफह येथे तिकीट विक्री सुरू होणार आहे.

 

Related posts: