|Thursday, November 14, 2019
You are here: Home » मनोरंजन » प्रेमाची आगळीवेगळी कहाणी ‘दिल से दिल तक’

प्रेमाची आगळीवेगळी कहाणी ‘दिल से दिल तक’ 

मानवी नात्याच्या गुंतागुंतीवर भर देऊन कलर्सने 2017 ची पहिली भेट म्हणून प्रेक्षकांसाठी एक नवी मालिका आणली आहे. ‘दिल से दिल तक’ या कथेत आकंठ प्रेमात बुडालेल्या एका विवाहित जोडप्याच्या पार्थ (सिद्धार्थ शुक्ला) आणि शर्वरी भानुशाली (रश्मी देसाई) आयुष्याचा आणि त्यांच्यातील तफावतीमुळे त्यांच्या विवाहाला कुटुंबियांकडून असलेल्या विरोधाचा वेध घेण्यात आला आहे.

नशीबाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळेच आखून ठेवलेले असावे. कारण त्यांची आयुष्ये तेनीशी (जस्मिन भसीन) जोडली जाणार आहेत. त्यांच्या दैवाला आव्हान देणारा न दिसणारा अडथळा बनून ‘दिल से दिल तक’मध्ये मानवी नात्यातील गुंतागुंत दाखविण्यात येणार आहे. 30 जानेवारी 2017 पासून प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री 10.30 वाजता कलर्सवर प्रसारित होणार आहे.   

कलर्सच्या प्रोग्रामिंग प्रमुख मनिषा शर्मा म्हणाल्या, आपली अपेक्षा नसताना काही नाती खूपच रुचिपूर्ण असतात आणि त्यांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अमान्य करू शकत नाही. ‘दिल से दिल तक’मध्ये अशा काही भावनिक नात्यांना आवाहन केलेले दाखविले जाणार आहे ज्या अनोळखी आहेत. अशी नाती जी आपल्यावर नशीबाने लादली जातात. या शोमधून, कलर्सने शशी सुमित प्रॉडक्शनशी पुन्हा सहयोग केला आहे. पार्थ आणि शर्वरी यांची कथा सांगण्यासाठी, ज्यात त्यांच्या वैवाहिक जीवनात गुंतागुंतीच्या अडचणींमुळे तेनीशी त्यांचे नशीब बांधले जाते. त्यांच्या संस्कृतीमधील आणि त्यांच्या वाढविण्यातील उघड दिसून येणाऱया फरकामुळे अनेक पूर्वसंकेत मिळणार आहेत. ज्यामुळे प्रेक्षकांच्या हृदयावर आणि मनावर त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहणार आहे.

पार्थचे पात्र साकारण्याविषयी बोलताना अभिनेता सिद्धार्थ शुक्ला म्हणाला, ‘दिल से दिल तक’च्या निवेदनामध्ये परस्परातील विश्वास आणि आदर याविषयी सांगितलेले आहे जे दोन व्यक्तींना नेहमीसाठी एकत्र बांधून ठेवते. पार्थ हा एक अतिशय प्रेमळ आणि आश्वासक पती आहे, जो शर्वरीच्या चेहेऱयावर स्मित आणण्यासाठी काहीही करायला तयार आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाच्या या पैलूमुळे तो प्रेक्षकांचा अतिशय आवडता बनणार आहे.

शर्वरी साकारण्याविषयी बोलताना अभिनेत्री रश्मी देसाई म्हणाली, शर्वरी ही अतिशय आश्वासक पत्नी आहे, पार्थने तिच्याशी केलेल्या लग्नामुळे त्याचे कुटुंबाशी असलेले नाते तुटले हे मान्य आहे आणि ती ते सुधारण्याचा प्रयत्न करते आहे. त्याच्या पाठिंब्याविषयी तिला अतिशय कृतज्ञता आहे आणि तिच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळे ते कधीतरी एकत्र येतील अशी आशा तिला आहे. प्रेक्षक तिच्या पात्रात आणि ती शेवटी करत असलेल्या त्यागात खूपच गुंतत जाणार आहेत.

सिद्धार्थ शुक्ला, रश्मी देसाई आणि जस्मिन भसीन यांच्या सोबत अनेक नामवंत कलाकार असणार आहेत. त्या कलाकारांमध्ये तेजू सप्रू, डॉली मट्टू, सचिन पारीख रमणिक भानुशाली, वैष्णवी डोनाल्ड, उर्वशी उपाध्याय, करण गोडवानी, पूजा शर्मा, हिमानी शर्मा, ख्याती केसवानी, जिग्नेश जोशी यांच्या भूमिका यात आहेत.

Related posts: