|Thursday, November 14, 2019
You are here: Home » मनोरंजन » के दिल अभी भरा नहीं नाटकाची पंच्याहत्तरी

के दिल अभी भरा नहीं नाटकाची पंच्याहत्तरी 

पती-पत्नीचं नातं हे एक अजब रसायन आहे. कडू, गोड, तिखट आणि आंबट अशा नात्यातील विविध चवींचा आस्वाद या रसायनातून चाखायला मिळत असतो. सहजीवनाच्या या वाटचालीत बरेवाईट प्रसंगातून सुखद प्रवास करत आयुष्याच्या उतारवयात या रसायनात अधिक परिपक्वता येते. पती-पत्नीच्या याच नात्यावर ‘के दिल अभी भरा नही’ हे नाटक भाष्य करते. उतारवयातील जोडप्याची कथा मांडणारे हे नाटक लवकरच 75 व्या प्रयोगाकडे यशस्वी वाटचाल करीत आहे. गोपाल अलगिरी यांच्या वेद प्रॉडक्शन्स निर्मित या नाटकाची पंच्याहत्तरी नुकतीच मुंबईत पार पडली.

मंगेश कदम यांचे दिग्दर्शन असलेले हे नाटक खऱया आयुष्यातील घटनांचा वेध घेत असल्यामुळे नाटय़रसिकांना ते आपलेसे करण्यात यशस्वी होत आहे. खास करूनत ‘गोष्ट तशी गमतीची’ या गाजलेल्या नाटकाचे गमतीदार दाम्पत्य मंगेश कदम आणि लीना भागवत यांची रियल केमिस्ट्री या नाटकामधून दिसून येते. तसेच चंद्रशेखर कुलकर्णी, बागेश्री जोशीराव यांच्याही यात भूमिका आहेत. एकेकाळी विक्रम गोखले आणि रीमा लागू यांनी गाजवलेल्या या नाटकाला नव्याने उभे करत आजच्या नव्या दमाच्या कलाकारांनी ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकाला चांगलाच न्याय दिला आहे.

निवफतीनंतरचे तणावरहित आयुष्य जगू पाहणाऱया प्रत्येकाला हे नाटक आपलेसे करते. माणसे नोकरी लागली की आर्थिक व्यवस्थापनाचा विचार करायला सुरुवात करतात. मात्र, हे सगळं करत असताना भावनिक्XXाढ व्यवस्थापनाचा विचार करायचा ते विसरून जातात. या नाटकात अरुण आणि वंदना या जोडप्याच्या माध्यमातून उतारवयातील स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेल्या भावनिक गरजांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मनाला भावणारी आणि थोडय़ाबहुत फरकाने प्रत्येक घराघरातील गोष्ट मांडणारा हा उतरायण मनाला सहज भावेल, असे हे नाटक आहे.

Related posts: