|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगाव-चंदगडचे जिव्हाळय़ाचे संबंध

बेळगाव-चंदगडचे जिव्हाळय़ाचे संबंध 

चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचा वर्धापन दिन

प्रतिनिधी / बेळगाव

संघटित वृत्ती ही चंदगड तालुक्मयाचे मुख्य वैशिष्टय़ आहे. बेळगाव व चंदगडचे जिव्हाळय़ाचे संबंध असून चंदगड तालुका रहिवासी संघटनेच्यावतीने ते अधिक दृढ होत आहेत, असे प्रतिपादन मनपातील सत्ताधारी गटनेते पंढरी परब यांनी केले.

चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचा 15 वा वर्धापन दिन रविवारी वाङ्मय चर्चा मंडळ येथे उत्साहात पार पडला. प्रारंभी नगरसेवक पंढरी परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. एम. के. पाटील, निंगाप्पा पाटील, एकनाथ पाटील, अशोक थोरात उपस्थित होते.

बालिका आदर्श शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. संघटनेच्यावतीने देशभक्तीपर गीत, रांगोळी, चित्रकला, संगीतखुर्ची, बास्केटबॉल आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पंढरी परब यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

स्वागत व प्रास्ताविक एकनाथ पाटील यांनी तर आभार गंगाधर कंग्राळकर यांनी मानले.