|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » सुश्मिता सेन पुन्हा मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी जाणार

सुश्मिता सेन पुन्हा मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी जाणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

तेवीस वर्षांपूर्वी भारताला विश्वसुंदरीचा ताज मिळवून देणारी सुश्मिता सेन यंदा पुन्हा फिलिपिन्समध्ये होत असलेल्या 65 व्या विश्वसुंदर स्पर्धे
त सहभागी होत आहे. वयाच्या 18व्या वर्षी हा ताज मिळवलेली सुश्मिता 41 वर्षाची आहे. मात्र यंदा ती या स्पर्धेत जज म्हणून सहभागी होणार आहे.

या स्पर्धेच्या जज पॅनलवर निवड झाल्याचे सुश्मितानेच सांगितले आहे. 1994 साली मनिला येथे झालेल्या स्पर्धेत सुश्मिता विश्वसुंदरी ठरली आहे.

यावेळी सुश्मिताने सांगितले कि, तेवीस वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा तोच माहोल अनुभवायला मिळणार म्हणून खूप आनंद होतोय तसेच पुन्हा एकदा फिलिपिन्समध्ये जाण्याची संधी मिळतेय त्याची खुप उत्सुकताही आहे.

 

Related posts: