|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्वरी गटाध्यक्षपदी संजीव नाईक यांची निवड

पर्वरी गटाध्यक्षपदी संजीव नाईक यांची निवड 

प्रतिनिधी/ पर्वरी

पर्वरी काँगेस गटातील पदाधिकाऱयांनी मगोत प्रवेश केल्यामुळे नवीन कार्यकारिणीबद्दल  गोंधळ निर्माण झाला होता मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी एका आदेशाद्वारे माजी सरपंच संजीव नाईक यांची गटाध्यक्षपदी निवड करुन नवीन कार्यकारिणी जाहीर केली.

राजेश आमोणकर व प्रसाद फातार्डेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मगो पक्षाने पर्वरी मतदारसंघाची उमेदवारी राजेश आमोणकर यांना दिली. त्यामुळे काँग्रेस गटात उडालेला गोंधळ निर्माण झाला होता. त्याचा परिणाम म्हणून नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

पर्वरी गट काँग्रेसच नवीन समिती : गटाध्यक्ष – प्रभाकर उर्फ संजीव नाईक, इतर समिती – विवेनिया डिसोझा, जॉन मार्टीन, देविदास नाईक, अनील म्हार्दोळकर, ऍथोनी परेरा, राखी नाईक, व्हिटोरिया डिसोझा, चरण लोलयेकर, टेरल डिसोझा, जिहाद बेग, क्रितेश नाईक, स्टेफी फर्नांडिस, नेल्सन नोरोन्हा, उदय देसाई, रुवेल डिसोझा, श्रद्धा नाईक, गोविंद सावंत, अमित गाड, मार्शेल मिनेझिस, संतोष नाईक, मयुर पेडणेकर, सिद्धी नाईक, ऍन्थनी फर्नांडिस, सोमनाथ कवठणकर.

Related posts: