|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » कर्नाटकमध्ये काँग्रेस मंत्र्यांकडून 162 कोटींची रक्कम जप्त

कर्नाटकमध्ये काँग्रेस मंत्र्यांकडून 162 कोटींची रक्कम जप्त 

ऑनलाईन टीम / कर्नाटक :

आयकर विभागाने कर्नाटकमध्ये प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये सुमारे 162 कोटींहून आधिक अघोषित मालमत्ता आढळून आली. आयकर विभागाच्या या छाप्यात 41 लाख रूपयांच्या रोकडसह सोने, चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

मागील आठवडय़ात कर्नाटकचे लघुउद्योग मंत्री रमेश जारकिहळ्ळी आणि प्रदेश महिला काँग्रेसच्या आध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गोकाक आणि बेळगाव येथील मालमत्तेवर छापे टाकण्यात आले. यामध्ये मोठय़ाप्रमाणात बेनामी संपत्ती आणि स्पष्टीकरण देता न आलेल्या गुंतवणुकीत माहिती मिळाली, असल्याचे आयकर आधिकाऱयांनी सांगितले.

दोन्ही नेत्यांवर साखर उद्योग व सहकारी सोसायटय़ाच्या माध्यमातून मोठयाप्रमाणात काळा पैसा जमवल्याचा आरोप आहे. आयकर विभागाच्या आधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार जारकिहळ्ळी हे सौभाग्य लक्ष्मी शुगर लि.चे प्रमुख प्रमोटर आणि संचालक आहेत.

Related posts: