|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » ट्रम्प करणार मोदींशी ‘मन की बात’

ट्रम्प करणार मोदींशी ‘मन की बात’ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली:

अमेरिकेच्या 45व्या राष्ट्रध्याक्षपदावर नीकतेच रूजु झालेले डोनाल्ड ट्रम्प आज रात्री 11. 30 वाजता फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बातचित करणार आहेत. यावेळी भारतसंबंधी मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये संबंध मजबुत होतील, अशी अशा व्यक्त केली जात आहे.

20 जानेवारीला ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. व्हाईट हाऊसने मंगळवारी ट्रम्प यांचा नियोजित कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहिर केले. यानुसार आज रात्री 11.30 वाजता त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासबोत बातचित होणार आहे. 9 नोव्हेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प अमिरेकेच्या राष्ट्रध्याक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले. निवडणुकीतील त्यांच्या घवघवीत यशाबाबत मोदींनी त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या

Related posts: