|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » जॅकी चॅन कपिलच्या शोमध्ये शिकवणार ‘कुंग फू योगा’

जॅकी चॅन कपिलच्या शोमध्ये शिकवणार ‘कुंग फू योगा’ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आपल्या जबरदस्त फाइटिंगच्या प्रात्यक्षिकांसाठी प्रसिध्द असलेल्या अभिनेता जॅकी चॅन यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो भारतात दाखल झाले आहे. त्यांच्या ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी ते कपिलच्या शोमध्ये सहभागी झाले.

जॅकी चॅनसोबत बॅलिवूड अभिनेता सोनू सूदही या शोमध्ये दिसणार आहेत, नुकतेच त्यांच्या या एपिसोडचे चित्रकरण पूर्ण झाले असून कपिल शर्माने ट्विटरवरून त्याचा आनंद व्यक्त केला आहे. त्याने ट्विट केले की, हे एखदे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. जॅकी सरांना माझ्या सेटवर घेऊन देण्यसाठी सोनु तुझे धन्यवाद. काही दिवसांपासून जॅकी चॅन भारत दौऱयाच्र येणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या आणि अखेर चॅन भारतात दाखल झाले आहे.

Related posts: