|Saturday, December 7, 2019
You are here: Home » Top News » जम्मू – काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

जम्मू – काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार 

ऑनलाईन टीम / जम्मू काश्मीर :

सीमा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱया दोन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, ठार झालेले दहशतवादी हे लष्करी – ए – तोयबा संघटनेचे असल्याचे समजते. आज सकाळापासूनच काश्मीर येथील गांदरबल येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती.

दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर परिसरात सर्च ऑपरेशन जारी करण्यात आले आहे. चकमक सुरू असतानाच बाजूचा परिसर रिकामा करण्यात आला होता. मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडून 2 एके – 47 जप्त करण्यात आली. यापूर्वी 16 जानेवारी रोजी पहेलगम येथे 3 दहशतवाद्यांना भारतीय लष्कराच्या जवानांनी चकमकीत ठार मारले होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण जम्मू – काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवसथा तैनात करण्यात आली आहे.

Related posts: