|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » अभिषेक घोसाळकर यांची सेनेतून हकालपट्टी

अभिषेक घोसाळकर यांची सेनेतून हकालपट्टी 

उद्धव ठाकरे यांचे आदेश, तीन नगरसेवकांविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार भोवली

बोरिवली / प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग वाजले असतानाच दहिसरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल आचारसंहिता भंग करणाऱया नगसेवकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच मंगळवारी सेना पक्षप्रमुखांनी याप्रकरणी तक्रार करणाऱया नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे  पालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर मुंबई शिवसेनेत खळबळ माजली आहे. कारण, उत्तर मुंबई हा सेनेचे गड असून तेथून यापूर्वी पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले आहेत. या वादामुळे हा गड कायम राखणे हे पक्ष नेत्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान ‘मातोश्री’वरून घोसाळकर यांना माघार घेण्यासाठी दबाव येत असल्याचे समजते.

मंगळवारी सकाळी यासाठी त्यांच्याशी मिलिंद नार्वेकर यांनी संपर्क साधल्याचे समजते. या दरम्यान उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने घोसाळकर यांना दुपारी मालाडच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. याबाबतचे वफत्त पसरताच तेथे काही वेळातच शिवसैनिकांनी मोठी गर्दी केल्याने तणावाचे वातावरण पसरले होते. आता याप्रकरणी काय होणार याचीच चर्चा परिसरात होत होती. तर बोरिवली-दहिसर परिसरातील अनेक सामाजिक संस्थांनी नियमांचे उल्लंघन करणाऱया सेना नगरसेवकांवर कारवाईची मागणी केली आहे. या तक्रारीमुळे या तीनही नगरसेवकांची उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे स्वबळावर लढण्याचे संकेत असतानाच पालिकेत नगरसेवकांची संख्या कमी होऊ नये म्हणून पक्ष प्रमुखांची डोके दुखी वाढली आहे.

प्रभाग क्र. 1 चे सेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्याच पक्षाच्या नगरसेविका माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, प्रभाग अध्यक्ष शीतल म्हात्रे, नगरसेवक प्रा. अवकाश जाधव, सहाय्यक आयुक्त विजय कांबळे, दत्ता कोसंबे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, मनपा आयुक्त व निवडणूक अधिकारी आदींकडे केली होती. त्यामुळे प्रचार सुरू होण्यापूर्वीच सेनेतील वाद पेटला होता. बोरिवली-पश्चिम एलआयसी कॉलनी येथील कर्मयोगी उद्यानाचे उद्घाटन 14 जानेवारी 2017 रोजी करण्यात आल्याचा आरोप घोसाळकर यांनी केला. आदर्श आचारसंहिता 11 जानेवारीला जरी झाल्यानंतर जबाबदार लोकप्रतिनिधींनी असे कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी आयोगाची परवानगी घेतली होती का असा सवालही त्यांनी केला. यावेळी उद्यानाच्या विविध फलकाचे अनावरणही करण्यात आले. त्याचे चित्रिकरण व फोटो त्यांनी आयोगाकडे सादर केले आहेत. यावेळी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी एका जाहीर सभेचे आयोजन केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत सेना उमेदवार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात डॉ. शुभा राऊळ यांनी मनसेत प्रवेश करून निवडणूक लढविली होती. त्यावेळी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनीही घोसाळकरांवर आरोप करीत प्रचारापासून दूर राहणे पसंद केले होते. त्या निवडणुकीत घोसाळकर यांचा भाजपच्या नवख्या उमेदवार मनीषा चौधरी यांनी पराभव केला होता. पराभवानंतर राऊळ मनसेतून परत स्वगफही आल्या. त्याचदरम्यान घोसाळकर यांचे विभागप्रमुखपदही  काढून त्यांचे  एकेकाळचे  शिष्य प्रकाश कारकर यांना बहाल करण्यात आले. मातोश्री दरबारी घोसाळकर यांचे पंख छाटण्यासाठी शुभा राऊळ, शीतल म्हत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचे पुरते उट्टे काढण्यासाठी आता सेनेच्या या दोन्ही नगरसेविकांविरोधात अभिषेक घोसाळकर यांनी तक्रार केल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, घोसाळकर विभागप्रमुख असताना उत्तर मुंबई हा सदैव शिवसेनेचा गड राहिला होता. येथून सेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यात त्यांचे डावपेच सफल ठरत असत, असे असताना आता मुंबईत सेनेचे वर्चस्व पणाला लागले असतानाच त्यांना मात्र हेतूपरस्पर दूर ठेवले जात आहे.

Related posts: