|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » भरदिवसा डोंबिवलीत कॉलेज तरुणाची हत्या

भरदिवसा डोंबिवलीत कॉलेज तरुणाची हत्या 

मैत्रिणीच्या प्रियकराने केला हल्ला

कल्याण / प्रतिनिधी

महाविद्यालयात शिकणाऱया मुलीशी मैत्री करणे महाविद्यालयीन तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी डोंबिवलीत घडली. भरदिवसा सागर्ली परिसरात असलेल्या साऊथ इंडियन कॉलेजबाहेर प्रणय मोरे या तरुणावर धारधार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. आपल्या प्रेयसीची प्रणयबरोबर असलेली मैत्री सहन न झाल्याने संतापलेल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराने त्याच्यावर हल्ला केला असून, हल्लेखोर फरार झाले आहेत. भरदुपारी घडलेल्या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. प्रणय मोरे हा एफवाय बीकॉममध्ये शिक्षण घेत होता. विघ्नेश सरकटे असे हत्या करणाऱयाचे नाव आहे. मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

सागर्ली परिसरात साऊथ इंडियन कॉलेज आहे. याच कॉलेजमध्ये प्रणय शिक्षण घेत होता. त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱया एका मुलीशी त्याची मैत्री झाली. दरम्यान सदर मुलीने तिचा प्रियकर विघ्नेशसोबत महिन्याभरापासून बोलणे बंद केले होते. प्रणयशी मैत्री झाल्याने ती आपल्याशी बोलत नसल्याचा संशय विघ्नेशला होता. या संशयातून विघ्नेशने प्रणयला तिच्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर प्रणव मित्रांसह कॉलेजबाहेरील इमारतीजवळ बोलत उभा होता. त्यावेळी विघ्नेश आणि त्याच्या साथीदाराने त्याला बोलण्यासाठी बाजूला घेऊन गेले आणि प्रणयला काही समजायच्या आत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या शरीरावर 9  वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी झालेल्या प्रणवला जिमखान्याजवळील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान प्रणवचा मफत्यू झाला.

प्रणवचे आई-वडील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. शांत आणि कोणाच्याही अध्यात मध्यात नसणारी म्हणून प्रणय कॉलेज आणि मित्रांमध्ये प्रसिद्ध होता. तो त्याच्या कॉलेजच्या मित्रांच्या ग्रुपसोबतच जास्त असायचा, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली.

Related posts: