|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » रहिमतपुरात घोडय़ांच्या बाजारासाठी देशभरातून घोडी दाखल

रहिमतपुरात घोडय़ांच्या बाजारासाठी देशभरातून घोडी दाखल 

वार्ताहर / रहिमतपुर

मागील वर्षापासून रहिमतपूर नगरपरिषदेच्यावतीने अश्वपालक, अश्वशौकीनांसाठी घोडय़ांच्या बाजाराचे आयोजन करण्यात येते. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी ह्या बाजाराचे उद्घाटन केले जाते. लग्नकार्य, हौशेसाठी, छंद म्हणून पाळणाऱया अश्वप्रेमीसाठी हा बाजार चर्चेचा विषय असतो. रहिमतपूरला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने पुर्वीच्या काळी रहिमतपुरमध्ये घोडय़ावरुन बाजार होत असल्याचे जाणकार सांगतात.

मारवाडी, पंजाबी जातीच्या घोडय़ांची बाजारात शेकडो घोडी असल्याने, अश्वपालक आणि अश्वपेमींसाठी व्यवहारास सुरुवात झाल्याचे समजते. उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब येथील व्यापारी रहिमतपुर येथे अश्वासह डेरेदाखल झाले आहेत. घोडय़ांच्या देखणेपणा आणि शरीरावर असणाऱया लक्षणे बघुन खरेदी विक्रीचे व्यवहार चालत आहेत.

नगरपालिकेच्यावतीने वीज, पाणी, राहण्याची सुविधा दिल्या आहेत. विविध प्रकारचे घोडे पाहण्यासाठी अबालवृध्द बाजार पाहण्यासाठी येत आहेत.

नगराध्यक्ष आनंदा कोरे म्हणाले, परराज्यातील व्यापारी रहिमतपुर मध्ये आल्याने त्यांना सोयी सुविधा देण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रयत्न केले जाते. तसेच व्यापारी दृष्टय़ा रहिमतपुरला वेगळे स्थान मिळवण्यासाठी आणि छोटय़ा मोठय़ा व्यावसायिकांना बाजाराचा फायदा होणार आहे..

उपनगराध्यक्ष बेदील माने म्हणाले, रहिमतपुरमध्ये देखील अश्वपालक असल्याने, घोडेखरेदी आणि त्यांचा सांभाळ याबाबत वैचारिक देवाण घेवाण होत आहे. घोडय़ांच्या बाजारासाठी येणाऱया काळात वेगळी आर्थिक तरतुद करणार असल्याचे माने यांनी सांगितले.

Related posts: