|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राजेश वेरेकरांचा घरोघरी प्रचारांवर जोर

राजेश वेरेकरांचा घरोघरी प्रचारांवर जोर 

प्रतिनिधी/ फोंडा

फोंडा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे राजेश वेरेकर यांनी घरोघरी प्रचारावर जोर दिला असून आत्तापर्यंत त्यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. मोठय़ा संख्येने युवा कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.

प्रचाराच्या दुसऱया टप्प्यात त्यांनी खडपाबांध, यशवंतनगर, सांताप्रुज, वारखंडे, अंत्रुज नगर, कोटवाडा या फोंडा पालिका क्षेत्रातील भागांबरोबरच कुर्टी खांडेपार भागातही मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतलेल्या आहेत. फोंडय़ातील खडपाबांध, कोटवाडासारख्या भागात पाणी पुरवठय़ाची समस्या असल्याचे कैफियत येथील मतदार प्रामुख्याने मांडत असल्याचे राजेश वेरेकर यांनी सांगितले. बऱयाच भागात अजूनही कचऱयाचा प्रश्न आहे. माजी बांधकाम मंत्र्यांनी 24 तास पाणी पुरवठय़ाचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात फोंडा मतदारसंघात परिस्थिती वेगळीच आहे, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष मनोज केणी, कुर्टीचे माजी सरपंच सूरज नाईक, सांतान फर्नांडिस, पंचसदस्य आनंद जल्मी, शरद डांगी, जिर्न्बट फेर्रांव, राजा नागवेकर, संजय मावळणकर, जोसेफे फर्नांडिस, प्रमोद शहापूरकर, मनोज डांगी, समीर बडेसाब, सज्जद आगा, नेवयो पिरीस, लिओ फर्नांडिस,रॉकी डायस, दिलीप भामईकर, सईद व अन्य कार्यकर्ते प्रचारकार्यात सहभागी झाले आहेत.

 

Related posts: