|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बार बंदीच्या निर्णयावर फोंडा बार संघटनेची चर्चा

बार बंदीच्या निर्णयावर फोंडा बार संघटनेची चर्चा 

प्रतिनिधी/ फोंडा

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ानुसार येत्या 1 एप्रिल पासून देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील व राज्य महामार्गापासून 500 मीटर अंतरावर असलेली मद्यालये आणि मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहे.

या निवाडय़ाला अनुसरून फोंडा तालुका बार ऍण्ड रेस्टॉरंट ऑनर्स असोसिएशनची बैठक नुकतीच फोंडय़ात झाली. या बैठकीत बोलताना संघटनेचे अध्यक्ष पीटर फर्नांडिस यांनी सांगितले की, न्यायालयाच्या या आदेशाचा फटका गोवा राज्यातील बहुतांश बार व्यावसायिकांना बसणार आहे. भौगोलिक दृष्टय़ा विचार केल्यास गोवा हा छोटा प्रदेश असून मद्य विक्री करणारी जास्तीजास्त दुकाने महामार्गाच्या जवळच आहे. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत येतानाच गोव्यातील पर्यटन व्यवसायावरही याचा परिणाम होणार आहे. हॉटेल फेडरेशन ऑफ इंडियाने या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी मुख्य न्यायाधिशाकडे याचिका दाखल केली आहे. 3 फेब्रु. रोजी त्यावर सुनावणी होणार आहे या सुनावणीनंतर पुढील निर्णय घेण्यात येतील, असे या बैठकीत ठरविण्यात आले.

गोवा राज्यात साधारण 11 हजार कुटुंबे या व्यावसायावर अवलंबून आहेत. बार्देश तालुक्यातील संघटनेने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेऊन याविषयी त्यांना कल्पना दिली आहे. मात्र सध्या राज्यात निवडणुकीचा काळ असल्याने निवडणुकीनंतर याविषयावर चर्चा करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती श्री. फर्नांडिस यांनी दिली.

 

Related posts: