|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » संतप्त पालकांची समजूत काढण्यात शिक्षण खात्याच्या पथकाला यश

संतप्त पालकांची समजूत काढण्यात शिक्षण खात्याच्या पथकाला यश 

प्रतिनिधी / काणकोण

नुवे येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या वस्तूंची मोडतोड केल्याप्रकरणी जोपर्यंत कायदेशीर चौकशी होत नाही तोपर्यंत आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्याचा पालकांनी जो निर्णय घेतला होता त्याची गंभीर दखल शिक्षण खात्याने घेतली असून 23 रोजी दुपारी शिक्षण संचालक गजानन भट, दक्षिण गोवा विभागाचे रामकृष्ण सामंत आणि काणकोणचे भागशिक्षणाधिकारी गणेश शेट यांनी नुवे – श्रीस्थळ येथे भेट देऊन पालकांची समजूत काढली.

सध्या निवडणूक आचारसंहितेमुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कसलीही व्यवस्था करणे अशक्य असल्याचे पटवून देण्यात शिक्षण संचालकांना यश आले. मात्र मुलांना शाळेत न पाठविणे म्हणजे त्यांचे शैक्षणिक नुकसान असून मुलांना पिण्याचे पाणी घरून द्यावे, माध्यान्ह आहार तपासून खावा त्याचबरोबर वीजवाहिन्यांसंदर्भात काळजी घ्यावी, असा सल्ला यावेळी संचालकांनी दिला. त्यामुळे हा वाद सध्या तरी सुटल्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र पिण्याच्या पाण्याच्या टाकीची हानी करणे, शाळेत घुसून वस्तूंची मोडतोड करणे यामागे नेमका कोणाचा हात आहे हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे, असे मत चंद्रेश वेळीप यांनी व्यक्त केले.

Related posts: