|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तंदुरुस्त असेपर्यंत राजकारणात सक्रीय राहता येते

तंदुरुस्त असेपर्यंत राजकारणात सक्रीय राहता येते 

प्रतापसिंह राणे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन

प्रतिनिधी / पणजी

कोणत्याही वयापर्यंत आणि तंदुरुस्ती असेपर्यंत राजकारणात सक्रीय राहता येते. निवडणूक लढवायची की नाही, ते जनता-मतदार ठरवतात. गोवा हा पूर्वी केंद्रशासित प्रदेश होता आणि आता ते स्वतंत्र राज्य आहे. हे राज्य कोणी दिल्लीहून चालवायची गरज नाही. गोव्याची जनता राज्य चालवण्यास सक्षम आहे. त्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीहून लादण्याची आवश्यकता नाही, असे मत विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी व्यक्त केले आहे.

मंगळवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष इतर सर्व पक्षांपेक्षा चांगली कामगिरी करेल. काँग्रेसचे सरकार आल्यास खाण व्यवसाय मर्यादित आणि नियंत्रित पद्धतीने तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालू ठेवणार असून काँग्रेस नवीन कॅसिनो आणणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

गोमेकॉची स्थिती बिकट

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाकडे राणे यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, तेथे आरोग्य खाते वा आरोग्यमंत्र्यांचे लक्ष नाही. कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन तेथे नाही. गोमेकॉची स्थिती बिकट असून तेथील डॉक्टर्स तरी त्यांचे काम करत असले तरी त्यांच्यावर सर्वकाही सोपवता येत नाही आणि त्यांना दोष देण्यातही अर्थ नाही, असेही राणे यांनी नमूद केले.

डॉक्टरांचे पगार वाढविणार

काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास डॉक्टर्सचे पगार वाढवण्यात येतील तसेच मागील सरकारच्या चांगल्या योजनाही चालू ठेवण्यात येतील. त्याशिवाय बऱयाच नवीन कल्याणकारी योजना आणल्या जातील, असे राणे म्हणाले.

अनेक प्रश्नांवर ‘नो कॉमेन्ट’

गोव्यात काँग्रेसला किती जागा मिळतील? स्पष्ट बहुमत मिळणार का? यासारख्या अनेक प्रश्नांवर थेट उत्तरे देण्याचे त्यांनी टाळले. अनेक प्रश्नांवर त्यांनी ‘नो कॉमेन्ट’ अशीच उत्तरे दिली.

Related posts: