|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » बांधकाम मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाकडून टोल कर्मचाऱयाला मारहाण

बांधकाम मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाकडून टोल कर्मचाऱयाला मारहाण 

ऑनलाईन टीम / नाशिक :

मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षारक्षकाने टोल कर्मचाऱयाला बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. शिंदे यांना व्हीआयपी एन्ट्री न दिल्याने त्यांच्या सुरक्षारक्षकाने गोंधळ घालत कर्मचाऱयाला मारहाण केली.

संदीप घोंगडे असे मारहाण करण्यात आलेल्या टोल कर्मचाऱयाचे नाव आहे. एकनाथ शिंदे हे एका लग्नसोहळ्यासाठी नाशिकला गेले होते. नाशिकहून पुन्हा ठाण्याकडे जात असताना हा प्रकार घडला. घोंगडेला रक्तबंबाळ होईपर्यंत गंभीर मारहाण करण्यात आली. या जखमी कर्मचाऱयाने शिंदेंची माफी मागितल्यानंतर परिसरातील तणाव कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी घोंगडेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी सुरक्षारक्षकाने टोल कर्मचाऱयाला मारहाण केल्याचे आरोप फेटाळले आहे. जर असे काही आढळले तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Related posts: