|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » भांडुपकरांच्या समस्या केव्हा संपणार?

भांडुपकरांच्या समस्या केव्हा संपणार? 

मुंबई / प्रतिनिधी

गेल्या काही वर्षात भांडुपमध्ये नवीन बहुमजली टॉवर, शॉपिंग मॉल, इंटरनॅशनल स्कूल, थिएटर्स मोठय़ा प्रमाणात निर्माण झाले. मात्र, नोकरदार, कामगार, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांसाठी नवीन खड्डेमुक्त रस्ते, चालायला फुटपाथ, उद्याने, स्वच्छ प्रसाधनगफहे, भाजी मंडई, रिक्षा स्टॅण्ड, बस स्टॅण्ड, सरकारी हॉस्पिटल आणि शाळा-कॉलेज या सुविधा देण्यास आमचे लोकप्रतिनिधी विसरले. आतापर्यंत भांडुपच्या जनतेने सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निवडून देऊन विकासाची संधी दिली आहे.

डांबरी किंवा पेव्हरब्लॉकचे रस्ते, गटारे-नाले दुरुस्ती आणि स्वतःच्या नावांची जाहिरात टाकण्यासाठी शौचालय आणि शेड बांधणे याच्यापुढे आमच्या लोकप्रतिनिधींनी विचारच केलेला नाही. आज भांडुपची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणात पायाभूत सोयीसुविधांमध्ये सुधारणा काही होत नाहीत. ‘भांडुपला स्वतंत्र अग्निशमन दल, सुसज्ज सरकारी हॉस्पिटल, जलद रेल्वे गाडय़ांना थांबा, खड्डेमुक्त रस्ते, गर्दीची समस्या, अनधिकृत फेरीवाले, कोकण रेल्वेचा थांबा इत्यादी न्याय्य हक्क मिळावे, अशी निवडून येणाऱया लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा आहे.

सुरेश पाटील, भांडुप

Related posts: