|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शरद पॉलिटेक्नीकचा महाराष्ट्रात उच्चांकी निकाल

शरद पॉलिटेक्नीकचा महाराष्ट्रात उच्चांकी निकाल 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

यड्राव (ता. शिरोळ) येथील शरद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्नीकने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने घेतलेल्या 2016 च्या हिवाळी परिक्षेत उच्चांकी यश मिळविले आहे. तिसऱया वर्षाच्या इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशनच्या पुजा बलुर्गी हिने 96.11 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. विविध विभागातील 32 विद्यार्थ्यांनी 90 टक्केपेक्षा अधिक गुण यश मिळविले. विशेष श्रेणीत (75 टक्के पेक्षा अधिक) तब्बल 532 विद्यार्थी असून 510 विद्यार्थी प्रथम श्रेणीत (60 टक्के पेक्षा अधिक) गुण मिळविले आहेत. तब्बल 17 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.

तृतीय वर्षामध्ये अनुक्रमे पुजा बलुर्गी (96.11), नम्रता पाटील, वैष्णवी जाधव (93.33), स्वप्नाली मंत्री (93.25), प्रिती निडगुंडे (92.78), नेहा पाटील (92.67), नेहा भोसले (92.44), सरस्वती कटकधोंड (92.33), आरती शिंदे (92.22), सौरभ जाधव (92.11), कोमल चौगुले (91.41), स्नेहा दानवाडे (91), पुजा यड्रावे (90.63), सुकन्या आसोदे (90.44), ऋतुजा माने (90.11), उदय पाटील, राणी क्षीरसागर (90), द्वितीय वर्षातील ओंकार सरकार  (90.88), रूमान दर्यावर्दी (90.82), प्रथम वर्षातील अमन आथणीकर (93.23), शबनम मुजावर (92), राज नाईक (91.38), प्रथमेश ढवळे, अपूर्वा आरबाळे (90.92), सुमन माने, स्नेहल केटकाळे (90.31), पूनम बुरसे, प्रियंका पाटील, स्नेहल वडगे, सोनम आंबी, पृथ्वीराज भोसले, पंकड फुंडे यांनी 90 टक्केपक्षा अधिक गुण मिळविले.

त्याचबरोबर गणित विषयामध्ये अमन अथणीकर, राज नाईक, स्नेहल केटकाळे, शिवम पाटील, श्रेया पाटील, पूनम बुरसे, पृथ्वी चव्हाण, श्रृतीका गावडे, साक्षी पोर्लेकर, बेसिक सायन्स विषयामध्ये प्रथमेश ढवळे, स्नेहल केटकाळे, ऋचिता दानोळे, प्रतिक स्वाली, स्नेहल वाडगे, शबनम मुजावर, स्टेंथ ऑफ मटेरिअल्स विषयामध्ये सूरज कोरे, जावा प्रोगॅमिंगमध्ये प्रिती निडगुंडे या विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळविले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देवून एक उत्कृष्ट अभियंता बनविण्याचे काम शरद पॉलिटेक्नीक गेली आठ वर्षे करीत आहे. चांगला निकाल व पुढील शिक्षण न घेणाऱया प्रत्येक विद्यार्थ्यांला नोकरी देण्याचे काम महाविद्यालयाने केले आहे. शिक्षणाबरोबर प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, ऍक्टीव्हिटी स्लॉट, प्रोडक्शन सेंटर, अनेक कंपन्यांशी सामंजस्याचा करार या सर्व उपक्रमामुळेच उत्कृष्ट निकाल लागला आहे. त्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी कौतुक केले. प्राचार्य बी. एस. ताशीलदार, उपप्राचार्य पी. एम. भागवत, अपॅडमीक डिन सौ. जी. ए. शिंदे, ऍडमिस्ट्रीव्ह डिन प्रा. एम. ए. पाटील, स्टुडंड अफेअर्स प्रा. ए. बी. जाधव, इडस्ट्रीअल इन्स्टिटय़ूट इन्ट्राक्शन प्रा. एस. एस. माळी, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Related posts: