|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्रीकर केंद्रात व गोव्यातही रहाणार नाहीत

पर्रीकर केंद्रात व गोव्यातही रहाणार नाहीत 

प्रतिनिधी/ मडगाव

गोव्यात भाजपकडे मुख्यमंत्री होण्यालायक उमेदवार नाही. त्यामुळे केंद्रात गेलेल्या मनोहर पर्रीकर यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आणले जाणार असल्याची भाषा भाजपच्या नेत्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे केंद्रातील त्याचे मंत्रीपद जातील शिवाय गोव्यात पुन्हा भाजपला सत्ता मिळणार नाही. त्यामुळे पर्रीकर हे केंद्रातही रहाणार नाही व गोव्यातही रहाणार नसल्याची टीका काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी काल मडगावात बोलताना केली.

मडगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार दिगंबर कामत यांच्या जाहिरनाम्याच्या प्रकाशन सोहळय़ात दिग्विजय सिंग बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार दिगंबर कामत, अजित हेंगडे, अश्रफ पंडियाल, उपनगराध्यक्ष डॉरीस टेक्सेरा, गट अध्यक्ष गोपाळ नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दिग्विजय सिंग यांनी भाजपवर टीका करताना, या सरकारने गोव्याच्या जनतेची दिलाभूल केली व फक्त यु टर्न घेतल्याचा आरोप केला. गोव्याच्या हितासाठी आणि विकासासाठी पुन्हा काँग्रेसला सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी केले.

या वेळी बोलताना दिगंबर कामत म्हणाले, भाजपचे केवळ सूडबुद्धिचे राजकारण केले. आपण मडगावच्या विकासासाठी अनेक प्रकल्प आणले, पण हे प्रकल्प पूर्ण करण्यात भाजप सरकारला अपयश आले. ‘दिगंबर मुक्त मडगाव’ करण्याची भाषा भाजपचे नेते करतात, पण ते त्यांना कदापी शक्य नाही. फक्त मडगावकरांचे आराध्य दैवतच या बाबतीत निर्णय घेऊ शकते. अशी विधान करणारी 56 लोक आली तरी मडगावची जनता आपल्यासोबत असल्याने आपल्याला काही फरक पडत नाही.

दिगंबर कामत यांच्या जाहिरनाम्यातील काही ठराविक वैशिष्ठय़े पुढील प्रमाणे : मडगावच्या अत्याधुनिक जिल्हा इस्पितळाची पूर्णता करणे, सोनसोडो कचरा ठिगाऱयाची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावणे, अत्याधुनिक कदंब बस स्थानक बांधणे, मडगाव शहरासाठी व्यावसायिक व जबाबदार नागरिकांच्या सल्ल्याने आराखडा तयार करणे, सांडपाणी प्रकल्पाची पूर्तता करणे, जुन्या बसस्थानकावर बहूमजली पार्किग, फुड-कोर्ट निर्माण करणे, मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानची पूर्तता करणे, अत्याधुनिक सोयीसुविधांसह मडगावातील हायस्कूलांचे स्थलांतर करणे, मडगाव गार्डनचे सुशोभीकरण करणे, आजोबा-आजी पार्कची निर्मिती व चिमुरडय़ांसाठी खेळांगणे करणे, जिल्हा इस्पितळाच्या पूर्णतेनंतर हॉस्पिसियो इस्पितळाचा वारसा स्थळ म्हणून सांभाळ करणे, मडगावात विविध ठिकाणी उप-बाजारांची निर्मिती करणे, वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी गगनपथांची निर्मिती, छोटय़ा व मध्यम उद्योगांसाठी सोयीस्कर उद्यम नगर करणे, न्यू मार्केट व गांधी मार्केटला नवजीवन देणे, मडगावच्या हद्दीवर वाहतूक केंद्राची निर्मिती करणे, मडगावकरांसाठी 24-7 मदत वाहिनी, वाहतूक व पादचारी मित्र मडगांव, वाहतूक सिंग्नल, चिन्हे व पदपथ. स्थानिक स्वयं सेवा गटांसाठी मडगावात हस्तकला उत्सवाचे आयोजन करणे, नागरिक मैत्र केंद्र, शहराच्या सुविधेसाठी सर्वदूर सीटी-बस व्यवस्था करणे, उर्जा अपांरपरिक स्त्राsताच्या शैक्षणिक पार्कची निर्मिती करणे, पश्चिम बगलरस्ता व रिंगरोड व पेडा येथे रेल्वे ओवरब्रिज उभारणे इत्यादीचा समावेश आहे.

Related posts: