|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्याचा विकास केवळ भाजपने साध्य केला

गोव्याचा विकास केवळ भाजपने साध्य केला 

प्रतिनिधी/ मडगाव

गोव्याचा विकास केवळ भाजपमुळेच झाला. विकासाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास भाजप शिवाय पर्याय नसल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले. फातोर्डा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार दामू नाईक यांच्या प्रचार कार्यालयच्या उद्घाटन प्रसंगी काढले.

गोव्याच्या विकासासाठी भाजपला स्पष्ट बहुमत देण्याचे आवाहन श्री. पर्रीकर यांनी यावेळी बोलताना केले. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार सत्तेवर येणार असल्याने, फातोर्डा मतदारसंघातून आपल्याला भाजपचा आमदार हवाच असे ही ते म्हणाले.

निवडणूक आत्ता तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पक्षाला यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांना दिवस-रात्र काम करावे लागणार असल्याचे दामू नाईक या प्रसंगी म्हणाले. यावेळी डॉ. कार्मो व ऍड. विनय बोरकर यांनी फातोर्डा मतदारसंघातून दामू नाईक यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.

प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष अरूण फळदेसाई, नगरसेवक सुगंधा बांदेकर, जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर, माजी पोलीस अधीक्षक विष्णुदास वेर्णेकर, कामिलो बार्रेटो, मिलाग्रीस बार्रेटो, नीलेश कांदे, सुनील नाईक तसेच सुमारे 400 कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुर्णानंद च्यारी यांनी केले.

Related posts: