|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » यूपीत मायावतींची खेळी ; 99 मुस्लिम उमेदवार रिंगणात

यूपीत मायावतींची खेळी ; 99 मुस्लिम उमेदवार रिंगणात 

ऑनलाईन टीम / लखनऊ :

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ‘व्होट बँक’चे राजकारण जोरात रंगू लागले असून बसपा अध्यक्ष मायावती यांनी भाजप आमदारांच्या हत्येच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेला गँगस्टर मुख्तार अंसारीला पक्षात मानाचे पान दिले आहे. अन्सारीच्या नेतृत्वाखालील कौमी एकता दल बसपामध्ये विलीन झाले असून 99 मुस्लिम उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे समाजवादी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मायावती यांनी अल्पसंख्याक मतांवर डोळा ठेऊन तशी रणनीती आखण्यात सुरूवात केली आहे. समाजवादी पक्षातील गृहकलाचा फायदा घेत सपाच्या छोटय़ा मित्रांना बसपाकडे खेचण्याची चाल त्या खेळत आहेत. त्यातूनच त्यांनी उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात प्रभाव असलेल्या मुख्तार अन्सारीला पक्षाचे दार उघडले आहे.

कौमी एकता दलाच्या विलीनीकरणाबरोबरच मुख्तार अन्सारीला मऊ मतदारससंघातून, त्याचा मुलगा अब्बासला घोसी मतदारसंघातून तर मोठा भाऊ शिबगतुल्ला याला मोहम्मदाबादमधून बसपाचं तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या तीन मुस्लिम उमेदवारांची भर पडल्यानंतर बसपाच्या एकूण मुस्लिम उमेदवारांची संख्या 99 इतकी झाली आहे.

Related posts: