|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सोनूस येथे खनिजमाल वाहतूक रोखली

सोनूस येथे खनिजमाल वाहतूक रोखली 

प्रतिनिधी/ वाळपई

खनिज वाहतुकीमुळे होणाऱया प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयाची दिशाभूल करण्यासाठी अचानकपणे नियोजित मार्गाला बगल देत दुसऱया बाजूने खनिज मालाची वाहतूक करणाऱया सेसा गोवा, आर. एन. शेटय़े, फोमेन्तो व इतर कंपन्याविरोधात आज सकाळपासून सोनूस नागरिकांनी खनिज वाहतूक रोखून धरल्याने समस्या निर्माण झाली. तद्नंतर सेसा गोवा संस्थेचे संस्थापक श्री. कोहीलो यांनी नागरिकांत चर्चा करून त्यांच्या काही मागण्या मान्य केल्याने दु. 2.30 वाजल्यानंतर थनिज वाहतुकीस सुरुवात झाली. मात्र आर.एन. शेटय़े, फोमेन्तो कंपनीने आपली खनिज वाहतुक नागरिकांनी बेकायदेशीपणे रोखून धरण्याची तक्रार वाळपई पोलिस स्थानकावर दिली आहे. संबंधित नागरिकांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

यासंबंधीची माहिती अशी की सोनुस मार्गे सेसा गोवा, आर. एन. शेटय़े, फोमेन्तो व इतर सहा कंपन्याची खनिज माल वाहतुक होत असते. यामुळे धुळ प्रदुषणाच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. या संबंधीची लेखी तक्रार नागरिकांनी गोवा प्रदुषण मंडळाकडे सादर केली होती. यावर कार्यवाही करताना प्रदुषण मंडळ अधिकाऱयांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली असता सर्व खाण कंपन्यांना अचानकपणे बनवेगिरी करताना सर्व कंपन्याची वाहतुक अचानकपणे बंद करून अन्य मार्गाने वळविली होती. यामुळे संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने वाळपईचे पोलिस निरिक्षक दीपक पेडणेकर यांनी पोलिस बंदोबस्तासह दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. यावेळी सेसा गोवा खाण कंपनीच्या कनिष्ठ अधिकाऱयांना पाचारण करून त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र ही चर्चा यशस्वी होऊ शकली नाही. शेवटी सेसा गोवा खाण कंपनीच्या सरव्यवस्थापक जोसेफ कोहीलो यांना पाचारण करण्यात आले. यावेळी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अनेक मागण्या मान्य करम्यात आल्या आहेत. यात धुळ प्रदुषणावर नियंत्रण राखण्यासाठी कडक उपाययोजना करणे यावर दीर्घकाळ चर्चा करण्यात आली.

त्याचबरोबर स्थानिकांना रोजगारांची संधी देण्यावर कंपनीने होकार दिला आहे तसेच स्थानिकांच्या ट्रकांना येणाऱया चार दिवसांत कंपनीच्या सोनुस खाणीवर काम देण्यासाठी पूर्ण स्वरुपाचे प्रयत्न करण्यात येणार आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. कारण सदर खनिज खाणीस पर्यावरण खात्याचा परवाना मिळालेला नाही. सदर दाखला चार दिवसांत उपलब्ध झाल्यानंतर गाडय़ांना काम देण्यात येणार आहे अशा स्वरुपाच्या अनेक मागण्यांवर चर्चा होऊन नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

Related posts: