|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पंतप्रधनांची आज पणजीत सभा सर्व तयारी पूर्ण

पंतप्रधनांची आज पणजीत सभा सर्व तयारी पूर्ण 

प्रतिनिधी/ पणजी

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज शनिवारी सायंकाळी 3.30 वा. पणजीतील कांपाल मेदानावर होणार आहे. त्यांच्या या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात भाजप समर्थकांची उपस्थिती या सभेला लाभणार  असल्याचा दावा भाजपने केला आहे. मोदींकडून गोव्यासाठी काहीतरी चांगली घोषणा होण्याची शक्यता आहे, असे दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 ही सभा सायं 4.30 वाजता हेणार होती, परंतू पंतप्रधानांना अन्य ठिकाणी महत्वाचे काम असल्याने एक तास अगोदर ही सभा होणार आहे. यासाठी सर्व बंदोबस्त करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर, तसेच भाजपचे गोव्यातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहेत.

कांग्रेसचा जाहीरनामा दिशाभूल करणारा

 विरोधी पक्षाला माहीत आहे की ते सत्तेवर येणार नाहीत. त्यामुळे लोकांना खोटी अश्वासने देणे सुरु केले आहे. काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे ते दिशाभूल करणारा आहे. भाजपने सुरु केलेली गृहआधार योजनेची रक्कम वाढूवन ती 5 हजार करण्याचा कॉंग्रेसचा विचार आहे. तसेच युवकांना 5 लिटर पेट्रोल मोफत देण्याचे ठरविले आहे. हे फक्त मते मिळविण्यासाठी त्यांनी खोटे अश्वासन दिले आहे, असेही सावईकर म्हणाले.

भाजपचा जाहीरनामा उद्या

 उद्या रविवारी 29 रोजी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तो प्रसिद्ध केला जाणार आहे.

Related posts: