|Thursday, November 14, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये येणार अक्षयकुमार

‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये येणार अक्षयकुमार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेला सध्या प्रक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूरच्या लाला मातीतला रांगडा गडी राणा आणि गवातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली यांची प्रेमकथा चांगलीच बहरात आली आहे. आपल्या आगामी ‘जॉली एलएलबी2’ या चित्रपटाच्या प्रोमोशनासाठी अक्षय कुमार या मालिकेत बघायला मिळणार आहे.

या मालिकेचे हे विशेष भाग 1 आणि 2 फेब्रवारीला बघायला मिळणार आहे. अंजलीचा मित्र कल्पेश तिला आणि राणाला घेऊन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला असता तिथे राणाची गाठ जॉलीशी पडते. याठिकाणी कल्पेश कपडय़ांवरून आणि भाषेवरून राणाची टर उडवतो. यामुळे राणाचा आत्मविश्वास कमी होतो. याचवेळी एका ज्येष्ठ वकिलाची भेट घेण्यासाठी आलेला जॉली हा सगळा प्रकार बघतो आणि तो राणाला गाठून त्याला आपला ‘वकिली’ सल्ला देतो. राणाच्या मनात असलेल्या अंजलीबद्दलच्या भावना कशा खऱया आहेत आणि हे प्रेम कसे यशस्वी होइल या बद्दलचा विश्वास तो राणाला देतो.

Related posts: