|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कॅन्सरच्या समूळ उच्चाटनासाठी सँडवीच थेरपी महत्वाची

कॅन्सरच्या समूळ उच्चाटनासाठी सँडवीच थेरपी महत्वाची 

प्रतिनिधी / शिरोळ

कॅन्सर  संदर्भात समाजात वेगवेगळे गैरसमज निर्माण झाले आहेत. पण वेळीच उपचार घेतले तर बो बरा होवू शकतो, असे मत टाटा पॅन्सर हॉस्पिटलचे प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ. वसंत पै यांनी व्यक्त केले.

येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. चॅरिटेबल ट्रस्ट आरोग्य केंद्र व श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठ कणेरी (करवीर) यांच्या सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पॅन्सर (कर्करोग) रोगनिदान संबंधी मोफत मार्गदर्शन व उपचार शिबिराप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयसिंगपूर ठाण्याचे पोलीस उपाधिक्षक रमेश सरवदे होते. शिबिरास कणेरी मठाचे प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी भेट दिली. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, कणेरी मठ हॉस्पिटलचे सीईओ आर. डी. देसाई, सीओओ राजेश सोनार, प्रशासकीय अधिकारी विक्रम पाटील, पीआरओ विकास चौगुले प्रमुख उपस्थित होते.

डॉ. वसंत पै म्हणाले, कॅन्सर आजारासंबंधी सद्या समाजामध्ये मोठी भिती आहे. त्यासंबंधी पॅन्सर हा शरिरामध्ये चार टप्प्यात निर्माण होतो. पण पहिल्या दोन टप्प्यात त्यावरती सँडवीच थेरपीच्या सहाय्याने उपचार केल्यास तो कायमचा बरा होवू शकतो. यामुळे सँडवीच थेरपीचा पॅन्सरच्या समूळ उच्चाटनासाठी महत्वपूर्ण असल्याचेही डॉ. पै यांनी सांगितले.

देशात सद्या 25 लाख कॅन्सरचे रूग्ण असून दरवर्षी 2 लाख रूग्णांची यामध्ये भर पडत आहे. तर वर्षाला 2 लाख लोकांना मृत्यू पॅन्सरमुळे होत आहे. फळे व भाजीपाला यावर सद्या रासायनिक किटकनाशके, खते, यांच्या मोठय़ा प्रमाणात होणाऱया वापरामुळे तसेच तंबाखू, गुटखा, सिगारेट यांच्या सेवनामुळे पॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. महिलामध्येही सद्या देशात गर्भाशयाच्या व स्तनाच्या पॅन्सरचे प्रमाणात वाढ होत आहे. ही चिंतेची बाब आहे. यावर केमोथेरपी द्वारे कॅन्सर पूर्णपणे बरा होवू शकतो. पण पहिल्या दोन टप्प्यात त्याचे निदान होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

शिबिराच्या पहिल्या सत्रात डॉ. सुनंदा पै यांनी पॅन्सर कसा निर्माण होतो व त्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भात लघुपटाद्वारे मार्गदर्शन करून कॅन्सरची सात लक्षणे असून ती लक्षण आढळून आल्यास त्वरीत उपचार करून घेणे, गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकांनी या संदर्भातील विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही दिली.

शिबिरात डॉ. वसंत पै यांच्या सोबत डॉ. स्वप्निल जाधव, डॉ. वैशाली फुले यांच्यासह  प्राथमिक आरोग्य केंद्रातील अन्य डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली 50 हून अधिक पॅन्सर रूग्णांची तपासणी केली. डॉ. पै हे आठवडय़ातील गुरूवार, शुक्रवार आणि शनिवार पॅन्सरग्रस्त रूग्णांच्या सेवेसाठी सिद्धीगिरी हॉस्पिटल कणेरी मठ येथे उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत, त्याच्या लाभ रूग्णांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य दरगू गावडे, निवृत्त नायब तहसिलदार पंडीत काळे, दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, कारखान्याचे सर्व संचालक, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. आभार विकास चौगुले यांनी मानले.