|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पाक मधील बेपत्ता प्राध्यापक अखेर सुखरूपपणे परत

पाक मधील बेपत्ता प्राध्यापक अखेर सुखरूपपणे परत 

संयुक्त राष्ट्रसंघाकडून त्यांच्या सुरक्षेसंदर्भात पाकला देण्यात आली होती ताकीद

वृत्तसंस्था / इस्लामाबाद

मागील तीन आठवडय़ापासून बेपत्ता असलेले प्रसिद्ध पाकिस्तानी प्राध्यापक आणि मानवी हक्काविषयी आवाज उठवणारे आघाडीचे कार्यकर्ते काल रात्री सुखरूपपणे स्वगृही परतले आहेत.

  पाकिस्तानस्थित एका आघाडीच्या वृत्तमाध्यमाने पोलीसदलाचा हवाला देत फातीमा जिना युनिर्व्हसिटीचे प्राध्यापक आणि मानवीय हक्कविषयक कार्यकर्ते सलमान हैदर काल रात्री आपल्या घरी परतल्याचा दावा केला आहे. बानी गाला परिसरात  मित्रा सोबत फिरायला गेलेले सलमान जानेवारी 6 पासून बेपत्ता झाले होते.

विशेष म्हणजे या महिन्याच्या 12 तारखेलाच संयुक्त राष्ट्रसंघांच्या मानवाधिकार विषयक तज्ञांकडून पाक अधिकाऱयांना पाचारण करत बेपत्ता झालेल्या चार कार्यकर्त्यांच्या शोध मोहीमेला आणि त्यांच्या सूरक्षिततेविषयी काळजी घेण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी सख्त ताकीद देण्यात आली होती.

 मुस्लीमबहुल पाकिस्तानमधील कटृर धर्मांधावर टीकेचा आसूढ ओढणारे सलमान रात्री 10 पर्यंत न परतल्याने त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पलीकडून कोणताही प्रतीसाद मिळाला नसल्याचे सलमान यांचे भाऊ झीशान हैदर यांच्याकडून सांगण्यात आले होते. काही दिवसानी सलमान यांच्याकडून वापरण्यात येत असलेल्या कारसंदर्भात त्यांच्या पत्नीना अज्ञाताकडून एक संदेश पाठवण्यात आला होता. त्यामध्ये सलमान यांची गाडी कोरल चौक येथे असल्याचा दावा करत ते ताब्यात घेण्याविषयी सूचना करण्यात आली होती. नंतर कथित स्थळावरून पोलीसांकडून सलमान यांची गाडी हस्तगत करण्यात आली.

सलमान यांच्याबरोबरच बेपत्ता झालेल्या इतर तिघा जणांत वकास गोराया, असीम सईद आणि अहमद राजा नसीर या मानवी हक्काविषयी आवाज उठवणाऱया कार्यकर्त्यांचा समावेश आहे. धर्मविरोधी अपप्रचार केल्याचा या सर्वजणावर आरोप आहे. पाकिस्तानमध्ये याला गंभीर गुन्हेगारी कृत्य मानले
जाते.

Related posts: