|Monday, February 24, 2020
You are here: Home » क्रिडा » स्टुअर्ट लॉ विंडीजच्या मुख्य प्रशिक्षकपदी

स्टुअर्ट लॉ विंडीजच्या मुख्य प्रशिक्षकपदी 

वृत्तसंस्था/ ऍटिग्वा

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज स्टुअट लॉ आता नव्या भूमिकेत दिसणार असून विंडीज क्रिकेट मंडळाने त्याची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. विंडीज मंडळाने शनिवारी याबाबतची माहिती दिली. गतवर्षी फिल सिमोन्स यांना हटवण्यात आल्यानंतर विंडीज संघाचे मुख्य प्रशिक्षकपद रिकामे होते. स्टुअर्ट लॉ आता सिमोन्स यांची जागा घेतील. 15 फेब्रुवारी रोजी स्टुअर्ट आपला पदभार स्वीकारतील. ऑस्ट्रेलियातील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. शिवाय, स्टुअर्ट काही काळ श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदी राहिलेले आहेत. ऑस्ट्रेलियातर्फे त्याने 54 वनडे व 1 कसोटी सामना खेळलेला आहे. विंडीजचा प्रशिक्षक बनणारा तो तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. याआधी जॉन डायसन व बेनेट किंग यांनी विंडीज संघाचे प्रशिक्षकपद सांभाळलेले होते.

Related posts: