|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मडगावात ‘अब की बार सोला हजार’

मडगावात ‘अब की बार सोला हजार’ 

प्रतिनिधी/ मडगाव

मडगाव मतदारसंघातून 16 हजार मतांचे टार्गेट काँग्रेसने ठेवले असून ‘अब की बार सोला हजार’ असा जोरदार प्रचार काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिगंबर कामत यांनी सुरू केला आहे. श्री. कामत यांनी आत्ता पर्यंत प्रचाराच्या दोन फेऱया पूर्ण केल्या असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहचल्याचे सांगितले.

घरोघरी प्रचार पूर्ण झाल्यावर दिगंबर कामत यांनी आत्ता आपल्या कार्यकर्त्यासोबत कोपरा बैठका व जाहीर सभावर भर दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत 16 हजार मतांचे टार्गेट पूर्ण केले जाणार असल्याचा निर्धार त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपकडून आपल्यावर किती ही आरोप झाले तरी मतदार अशा आरोपांना बळी पडणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मडगावची जनता आपल्या पूर्णपणे ओळखते, आपला मडगावकरांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला कुणीच बळी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला वैयक्तिक तसेच गटागटांनी पाठिंबा देणाऱयाची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे. त्यामुळे आपले कार्यकर्ते देखील म्हणतात की, ‘अब की बार सोला हजार’ व हेच ब्रिद वाक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts: