|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुंबईसह राज्यभर उद्या चक्काजाम

मुंबईसह राज्यभर उद्या चक्काजाम 

प्रतिनिधी/ मुंबई

कोपर्डी अत्याचार प्रकरण तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी दादरच्या शिवाजी मंदिर सभागफहात मराठा क्रांती मोर्चाची एक गुप्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत चक्काजाम आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. 31 जानेवारीला मराठा क्रांती मोर्चातर्पे संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी आमची पूर्ण तयारी झाली असून, उद्या मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन देणार आहोत. या आंदोलनास परवानगी मिळो अथवा न मिळो आंदोलन तर होणारच. सकाळी 8 वाजता चक्काजाम आंदोलनाला सुरुवात होणार असून, शहरातील मुख्य रस्त्यावर हे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे शिवराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले. या बैठकीत शिवराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्यासह मुंबईतील मराठा महासंघ, ‘छावा’ सारख्या अनेक संस्थांच्या पदाधिकाऱयांनी भाग घेतला होता.

संपूर्ण मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गटागटाने मुख्य मार्गावर चक्काजाम करणार आहेत. ज्या भागात कार्यकर्ते आंदोलन करतील त्या भागातील कार्यकर्त्यांनी पोलिसांना आंदोलनांची सूचना देण्याचे बैठकीत ठरले आहे. आंदोलन शांतपणे होणार असून कोणत्याही राष्ट्रीय संपत्तीची हानी होणार नाही याची दक्षता आंदोलक घेणार आहेत. मुंबईत 15 ते 20 ठिकाणी चक्काजाम आंदोलन होणार असून स्थान ठरविण्यात आलेले नाही. आमच्या मागण्यांकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक कानाडोळा करणार असेल तर 6 मार्च रोजी मराठा क्रांती मोर्चातर्पे ‘महामोर्चा’ काढणार आहोत. या महामोर्चाची राज्य सरकारने दखल न घेतल्यास राज्य सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलक पब्लिक ट्रान्सपोर्टला लक्ष्य करणार असून, चक्काजाम आंदोलनासाठी त्यांनी वडाळा हार्बर रेल्वेस्थानक, दादर रेल्वेस्थानक, खेरवाडी (वांद्रे), सी लिंक द्रुतगती मार्ग, ठाणे मुंबई द्रुतगती मार्ग निवडला असून आंदोलक रेल्वे स्थानकातही रेलरोको करणार असल्याचे समजते.

Related posts: