राहूल गांधी विरोधात खटल्याच्या सुनावणीला 3 मार्चपर्यंत स्थगिती

ऑनलाईन टीम / ठाणे :
महात्मा गांधी यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टिकेवरून दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी भिवंडीतील न्यायालयात सुनावणीसाठी दाखल झाले होते. मात्र भिवंडी न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीला 3 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असलेले राहुल गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी सुनावणीसाठी भिवंडीत आले होते. मात्र या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाकडून 3 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. याप्रकरणी मागील सुनावणीवेळी भिवंडीत दंडाधिकारी न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला होता त्यावेळेही राहुल गांधी न्यायालयात उपस्थित राहिले होते. मागील सुनावणीमुळे न्यायालयाने या प्रकरणात 30 जानेवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली होती.