|Saturday, October 19, 2019
You are here: Home » उद्योग » देशात एकापेक्षा अधिक पॅनकार्ड बाळगणाऱयांवर ‘प्राप्तिकर’ची नजर

देशात एकापेक्षा अधिक पॅनकार्ड बाळगणाऱयांवर ‘प्राप्तिकर’ची नजर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

नागरिकांचे एकसारखे पत्ते, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल या सारख्या माहितीच्या आधारे एकापेक्षा अधिक पॅन कार्डधारकांवर प्राप्तिकर विभागाची नजर आहे. या प्रकारची माहिती गोळा करण्यासाठी आकडेवारी विश्लेषक कंपनीचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्याच्या कर प्रणालीमध्ये सुधारणा घडवून आणणे आणि करचोरी रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात येणार आहेत. खासगी कंपनीच्या मदतीने अनेक पॅनकार्ड धारकांची माहिती गोळा करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

मॅनेज्ड् सर्व्हिस प्रोव्हायडर (एमएसपी) ची मदत घेण्यात येईल. एमएसपी विश्लेषणसंबंधी माहिती, आकडेवारी गोळा करणार आहे आणि त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे. बँका, टपाल कार्यालये आणि अन्य स्त्रोतांच्या साहाय्याने आकडेवारी आणि बनावट माहिती गोळा करण्यात येईल. या माहितीच्या साहाय्याने घोटाळय़ांचा तपास लावता येईल आणि ही माहिती विभागाला देण्यात येईल. नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर रिटर्न, टीडीएस, कर भरणा या माहितीच्या आधारे पॅनकार्डधारकांची माहिती गोळा करण्यात येणार आहे, असे एका अधिकाऱयाने सांगितले.