|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » साहित्यावरील खाडाखोड प्रकरणी 7 रुग्णालयांवर करवाई

साहित्यावरील खाडाखोड प्रकरणी 7 रुग्णालयांवर करवाई 

वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून रुग्णालयांची तपासणी

मुंबई / प्रतिनिधी

रुग्णालयांमध्ये वापरण्यात येणाऱया साहित्यांवरील माहितीची खाडाखोड करुन चुकीची माहिती दिल्याप्रकरणी मुंबईतील सात रुग्णालयांवर सोमवारी वैध मापन शास्त्र यंत्रणेने कारवाई केली. बलून डिव्हाईस, अँजीओग्राफिक पॅथेटर, आयवी पॅथेटर यासारख्या उपकरणांवरील फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती वैधमापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांना मिळाल्याने कारवाई करण्यात आली असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

वैद्यकीय रुग्णालयांमध्ये वापरण्यात येणाऱया वस्तूंवर वैधमापनशास्त्र अधिनियमानुसार नसून छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री करण्यात येत होती. गुप्ता यांनी विशेष मोहीम राबवून मुंबईतील वांद्रा येथील लीलावती हॉस्पिटल व एशियन हार्ट इन्स्टिटय़ूट, मुलुंडमधील फोर्टिज हॉस्पिटल, अंधेरीतील कोकीलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटल, परळमधील ग्लोबल हॉस्पिटल, पवईतील हिरानंदांनी हॉस्पिटल व सर एच.एन. हॉस्पिटल (रिलायन्स फाऊंडेशन) या रुग्णालयांची तपासणी केली. या कारवाईमध्ये रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱया बलून डिव्हाईस, अँजोग्रा†िफक पॅथेटर, युरेटिक युरोवर्लड, पॅब्रिक नॅचरल फायबर, आयवी पॅथेटर, गाईड वायर, ब्रथिक सर्किट, लिंबो सिंगललिम अनेथेसिया, हॅनसन ग्लोज, ब्लड कलेक्टर सारख्या आवेष्टनावर वैधमापन शास्त्र अधिनियमानुसार माहिती  छापली नसल्याचे आढळून आले. तसेच रुग्णालयांमधील वजनमापांची पडताळणी व मुद्रांकन न केल्याप्रकरणी या रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे.

साहित्यांवर घोषित किमत व रुग्णालय व्यवस्थापनाद्वारे रुग्णांकडून आकारण्यात येणाऱया दरातील तफावतीसंबंधीची तपासणी वैधमापनशास्त्र यंत्रणेकडून करण्यात येत आहे. छापील किंमतीपेक्षा जास्त दर आकारून रुग्णांची फसवणूक करणाऱयांविरुद्ध कारवाई करण्यात येत असून ग्राहकांनी अशा प्रकाराविरुद्ध जागरुक रहावे, असे आवाहन गुप्ता यांनी केले.

Related posts: