|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » भाजपच अपारदर्शक, सरकार बहुमतात आणण्यासाठी कोणाशी डिल केले – शिवसेना

भाजपच अपारदर्शक, सरकार बहुमतात आणण्यासाठी कोणाशी डिल केले – शिवसेना 

पारदर्शक मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे

मुंबई / प्रतिनिधी

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर पक्षाचे नेते, मुख्यमंत्री पारदर्शकता नको असल्यानेच शिवसेनेने युती तोडल्याचा आरोप करीत आहेत. शिवसेनेनेच केवळ महापालिकेत नको तर केंद्रात राज्यात कॅबिनेटमध्येही पारदर्शकतेचा आग्रह धरला होता. भाजप पारदर्शकतेचा एवढाच टेंभा मिरवत असेल तर शिवसेनेने सरकारमध्ये सामिल होण्यापूर्वी अल्पमतातील सरकारला बहुमतात आणण्यासाठी भाजपने कोणाची मदत घेतली, कसा गोंधळ घातला, कोणाशी कशा प्रकारे डिल केले, याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनीच द्यावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे ऍड. अनिल परब यांनी करत थेट मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल केला आहे.

एवढेच नव्हे तर पारदर्शकतेचे धडे देणारे भाजपचे सरकारच अपारदर्शक आहे, असा आरोपही अनिल परब यांनी केला आहे. ते शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई महापालिका निवडणुकीत पारदर्शकतेची अट ठेवत शिवसेनेची केंडी करू पाहणाऱया भाजपवरच पारदर्शकतेवरून हल्लाबोल करीत शिवसेना नेत्यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युती तुटली होती. भाजपाने सरकार स्थापनेसाठी अल्पमतात असतांनाही या सरकारला बहुमत कसे काय सिद्ध केले, कसा काय गेंधळ घातला, कोणाची मदत घेतली आणि कोणाशी डिल केले ही सर्व माहिती आजही गुलदस्त्यात आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात या सरकारच्या पारदर्शकतेबाबतच संशय आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री यांनीच याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवे असे ऍड अनिल परब म्हणाले

तसेच भाजपाने व मुख्यमंत्री यांनी प्रथम सरकार स्थापनेबाबत स्पष्टीकरण द्यावे नंतरच पारदर्शकतेवर बोलावे अन्यथा त्यांना पारदर्शकतेवर बोलण्याचाही अधिकार नाही असेही ऍड परब म्हणाले.

………………… तो पर्यंतच शिवसेनेचा पाठिंबा

सध्या आम्ही सरकारमध्ये आहोत. मात्र जोपर्यंत शिवसेना पाठिंबा काढत नाही तोपर्यंतच सरकारला पाठिंबा राहिल आमचा सरकारला आजही पाठिंबा आहे असे अनिल परब यांनी  एका प्रश्नाच्या उत्तराला सांगितले

Related posts: