|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ठाण्यात शिवसेनेचा वचननामा जाहीर

ठाण्यात शिवसेनेचा वचननामा जाहीर 

शाई धरण, परिवहनसेवा, क्लस्टरवरला प्राध्यान्य

ठाणे / प्रतिनिधी

ठाण्यात सेना-भाजपची युती तुटल्यानंतर ठाणे महानगर पालिकेची निवडणूक अवघ्या तीन आठवडय़ावर येऊन ठेपली असताना शिवसेनेने ठाण्यात सर्वप्रथम वचननामप् जाहीर करून जोरदार शक्तीप्रदर्शनाला सुरवात केली. या वचननाम्यात  ठाणेकरांसाठी शाई धारण बनविणाराच, सक्षम ठाणे परिवहन सेवा, 500 फुटांच्या घरांना करमुक्त, उच्च न्यायालयात याचिका निकाली निघताच क्लस्टरवर निर्णय, सीआरझेड बाधित कोळीवाडे व इमारतींना सवलती देऊन विकासाचा मार्ग मोकळा करणार, प्रलंबित एसआरए योजनेला गती देणार, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तीनहात नका येथे इंटिग्रेट मोबिलिटी प्लॅन, अशा विविध विकासकामे सत्तेवर आल्यास करण्यात येणार असल्याचा विश्वास ठाण्यातील शिवसेनेने आपल्या वचननाम्याच्या माध्यमातून ठाणेकरांना आश्वासने दिली आहेत. सोमवारी दुपारी ठाण्याच्या टिपटॉप प्लाझामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे, आणि खासदार श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, सुभाष भोईर, महापौर संजय मोरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, सभागफह नेत्या अनिता गौरी यांच्या उपस्थित शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शिवसेनेने 25 वर्षात मोठय़ा प्रमाणात विकासकामे करून शहर प्रगत केले. खोटे वचननामे देऊन एकदा फार फार तर दुसऱयांदा निवडून येता येते शिवसेनेला सातत्याने 25 वर्ष ठाणेकरांनी निवडून दिले. ते उगीच नाही, कारण शिवसेना निवडणूक अली म्हणून कामे करीत नाही, तर नेहमीच कार्यरत असते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. रस्ता रुंदीकरणात विस्थापितांना दिलेला शब्द पळाल्यानेच विनाविरोध रस्त्यांची कामे पार पडली. विस्थापितांचे रेंटल स्कीमच्या घरांमध्ये केलेलं पुनर्वसन हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन हे 300 ते 325 फुटांचे असेल असे सांगितले.

शिवसेनेचा ठाण्याचा वचननामा जाहीर केला. यात ठाणे पूर्व येथे सॅटिस, तिन्हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन, वाहतूक कोंडीला सोडविण्यासाठी इंटिग्रेटेड मोबिलिटी प्लॅन, ठाणे-बोरिवली टनेल मार्गाच्या जलद अंमलबजावणीसाठी प्रयत्न, सिडको ते गायमुख कोस्टल बायपास, श्रीनगर ते गायमुख डोंगरा लागत बायपास, कळवा नाका ते चौक बायपास, रस्त्यांची सुधारणा, कोपरी ब्रिजचे चौपदरीकरण, ठाण्यात मंजूर कॅन्सर रुग्णालय पूर्ण करणे, संकरा नेत्रालय रुग्णालय, पार स्पेशालिटी रुग्णालय, बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच, डायबेटीस क्युअर सेंटर, 10 ठिकाणी डायलेसिस सेंटर माफक दारात जेनेरिक औषधे दुकाने अशा विविध विकास कामांची पूर्तता करून ती ठाणेकरांच्या सेवेशी सादर करण्याचे आश्वासन वचननाम्यात देण्यात आले आहे.

 शाई धरण करणारच

शाई धारण शिवसेना करणारच असा निर्धार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करण्यात आला. शिवसेना दिलेला शब्द पळतो, शिवसेनेने कधीही ठाण्याच्या विकासकामात राजकारण आणले नसल्याचे स्पष्ट केले.

सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱया विरोधात तक्रार करणार

शिवसेनेच्या नेत्यांच्या चारित्र्य हननाचा सर्रास प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपद्वारे करण्यात येत आहे. ‘साहेबांचे गुंड’ असे संबोधून व्यक्तीचे छायाचित्र ही लावण्यात आल्याने भाजपच्या या विरोधाला सडेतोड उत्तर देण्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱयांविरोधात कारवाईची मागणी शिवसेनेने तक्रार करून केली असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Related posts: