|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » आंबेडकरी जनतेच्या हक्कासाठी शिवसेनाच पर्याय

आंबेडकरी जनतेच्या हक्कासाठी शिवसेनाच पर्याय 

अर्जुन डांगळे,अध्यक्ष जनशक्ती रिपब्लिकन पक्ष

मुंबई / प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मेहनतीने उभारलेल्या आंबेडकर भवन आणि प्रिटिंग प्रेस राज्य सरकारने पाडली असून आंबेडकरी जनतेच्या हक्कासाठी शिवसेना जाहिरपणे सरकारच्या या निर्णयाविरोधात उतरली होती. त्यामुळे राज्यामध्ये आंबेडकरी जनतेला न्याय आणि त्यांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना हाच मुख्य पर्याय आहे. त्यामुळे बहुजन आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या नागरिकांनी आपल्या हक्क मिळविण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे.

   तुम्ही पालिका निवडणूक कोणत्या मुद्यावर लढणार ?

आंबेडकरी जनतेची प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी   गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मला महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. आंबेडकरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना पक्ष महत्त्वाची भुमिका बजावणारे आहे. जनशक्ती रिपब्लिकन पक्ष हे शिवसेनेच्या जाहिरनामा यावरच निवडणूक लढणार. मी आणि माझा समाज शिवसेनेच्या बाजून खंबीरपणे उभा आहे.

मुंबई महापालिकेमध्ये तुम्ही किती जागा लढविणार ?

आम्ही जागाची मागणी केली नाही. मात्र, आम्हाला मुंबईतील महत्त्वाच्या भागामधील जवळपास 6 जागा मिळणार आहे. आंबेडकरी जनतेचा लोकसंख्या जास्त असलेल्या वार्डमध्ये आम्ही आमचे उमेदवार उतरविणार आहे. शिवसेना आणि आम्ही दोन्ही मिळून आम्हाला मिळालेल्या जागेवर मिळून जाहीर सभा आणि प्रचार मोहीम करणार असून जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, असे आमचे प्रयत्न असणार आहे.

तुमच्या पक्षाचे मुद्दे काय असणार ?

आंबेडकरी जनता, मराठी माणूस, कामगार, आंबेडकर भवन पाडणाऱयांवर कारवाई यांच्यासह गोरगरीब जनतेच्या विकासाठी आम्ही ही मुंबई महापालिका निवडणूक लढणार आहोत. आम्ही विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेसोबत त्यामुळे आंबड़करी जनतेच्या प्रश्नाबाबत सेनेला चांगली माहिती आहे, त्यामुळे आम्हाला त्यांचे प्रश्न सोडविण्यास सोपे जाणार आहे.

  राज्यात तुम्ही शिवसेनेसोबत किती जागांवर लढणार ?

इतर राज्यामध्ये जशी प्रादेशिक पक्षाची ताकद आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्येदेखील झाली पाहिजे. मात्र, महाराष्ट्रामध्ये परिस्थिती उलट आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय पक्षाची ताकत वाढत चालली आहे. त्यामुळे अशा राष्ट्रीय पक्षांच्या दिशाभूल करणाऱया जाहिनामांना बळी न पडता प्रादेशिक पक्षाला बळकट करणे हेच आमचे आता उद्देश आहे.

Related posts: