|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » Top News » मनसेने आपला पक्ष शिवसेनेत विसर्जित करावा

मनसेने आपला पक्ष शिवसेनेत विसर्जित करावा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

जर मनसे शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देत असेल, तर त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमदेवारच उभे करु नयेत, मनसेने आपला पक्ष शिवसेनेत विसर्जित करावा, अशी पोस्ट शिवसेनेकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे.

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याने मनसेने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले. तसेच यासाठी उमेदवारांबाबत कोणतीही शर्त ठेवण्यात आली नाही. शिवसेना आणि मनसेची युती व्हावी, यासाठीचा मनसे नेते बाळा नांदगावकर हे ‘मातोश्री’वर युतीबाबतचा प्रस्ताव शिवसेनेला देण्यासाठी गेले होते. त्यानंतर शिवसेनेने कोणाशीही युती करणार नसल्याचे जाहीर केल्याने या शक्यतांवर पूर्णविराम मिळाला.

दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडीनंतर, जर मनसे शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देत असेल, तर त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमदेवारच उभे करु नयेत, मनसेने आपला पक्ष शिवसेनेत विसर्जित करावा, अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर पसरत आहे.

Related posts: