|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » Top News » ‘ती’ पोस्ट पक्षाची नाही ; शिवसेनेचे स्पष्टीकरण

‘ती’ पोस्ट पक्षाची नाही ; शिवसेनेचे स्पष्टीकरण 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मनसेने आपला पक्ष शिवसेनेमध्ये विसर्जित करावा आणि आपले उमेदवार उभे करु नयेत, अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे या पोस्टवर शिवसेनेने स्पष्टीकरण देत, ती पोस्ट पक्षाकडून व्हायरल करण्यात आली नसल्याचे सांगितले.

भाजपा आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर मनसेने शिवसेनेला युतीसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र, युतीसाठीचा हा प्रस्ताव शिवसेनेने धुडकावून लावला. त्यानंतर आज दिवसभरापासून मनसेला उद्देशून एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. या पोस्टबाबत शिवसेनेने स्पष्टीकरण देत सांगितले, मनसेबाबत व्हायरल झालेली ही पोस्ट शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही.

Related posts: