|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची इराणकडून चाचणी

बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची इराणकडून चाचणी 

वृत्तसंस्था/ तेहरान

इराणने मध्यम टप्प्याची मारकक्षमता असणाऱया बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राने प्रक्षेपणानंतर जवळपास 1000 किलोमीटरचे अंतर गाठले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी या चाचणीवर चिंता व्यक्त केली आहे.

ही चाचणी इराणच्या समनान प्रांतानजीक करण्यात आली. अधिकाऱयांनुसार खोर्रामशहर मध्यम टप्प्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा 600 मैल अंतरापर्यंत जाण्याआधीच स्फोट झाला. संरक्षणमंत्री ब्रिगेडियर जनरल हुसेन दहकन यांच्यानुसार इराण सप्टेंबरमध्ये क्षेपणास्त्राची निर्मिती सुरू करणार आहे. अमेरिकेच्या अधिकाऱयांनी देखील या चाचणीची पुष्टी दिली आहे. इराणद्वारे याप्रकारची अंतिम चाचणी जुलै 2016 मध्ये करण्यात आली होती.

इस्रायलचा आक्षेप

नेतान्याहू यांनी इराणद्वारे पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणीवर चिंता व्यक्त केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराण विरोधात कठोर निर्बंध लादण्याचे आवाहन करू असे त्यांनी म्हटले. व्हाइट हाउसकडून नेतान्याहू यांच्या अमेरिका दौऱयाच्या घोषणेनंतर त्वरित नेत्यानाहू यांनी ही माहिती दिली. इराणने पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी करून सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला. इराणच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर प्रतिक्रियेशिवाय दिले जाऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.

Related posts: