|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » अर्थसंकल्प एक दिवस पुढे ढकलण्यात यावा -काँग्रेस

अर्थसंकल्प एक दिवस पुढे ढकलण्यात यावा -काँग्रेस 

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली :

 खासदार ई अहमद यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प सादरीकरणाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती, मात्र अर्थसंकल्प आजच सादर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली अर्थमंत्रालयात दाखल झाले असून,माजी केंद्रीय मंत्री ई. अहमद यांच्या निधनानंतर आमच्या मते आणि केरळ तसेच जदयूच्या काही नेत्यांच्या मते केंद्रीय अर्थसंकल्प एक दिवस पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी , काँग्रेस नेते  मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. 

अहमद यांच्या निधनामुळे 1 फेब्रुवारीस पहिल्यांदाज सादर होणाऱया अर्थसंकल्प सादरीकरणावर अनिश्चतेचे सावट पसरले आहे. परंपरेनुसार विद्यमान सदसयाचे अधिवेशनादरम्यान निधन झाल्यास शोक व्यक्त करून सभागृहाचे कामाकाज तहकूब केले जाते. आता लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागाले आहे.

Related posts: