|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोन्यांच बाशिंग लगीन देवाचं लागलं …

सोन्यांच बाशिंग लगीन देवाचं लागलं … 

वसंतपंचमीनिमित्त श्री विठठल रूक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न

पंढरपूर / प्रतिनिधी

पंढरपूरात वाजतं गाजतं …. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं…. या भक्तीगीतांच्या आणि विठुरायांच्या जयघोषात आज विठठलांचे आणि रूकिमणीमातेचा विवाहसोहळा येथील विठठल मंदिरात मोठया थाटामाटात आणि सनई चौघडयांच्या निनादात संपन्न झाला. यावेळी सुमारे दोन हजाराहून अधिक व-हाडी मंडळीही उपस्थित होते.

       सकाळी साधारणपणे 9 वाजता ह.भ.प. अनुराधा दिदि शेटे यांची रूक्मिणी स्वयंवरांची कथा येथील सभामंडपात सुरू झाली. यावेळी संपूर्ण विठठल मंदिरात फ्ढgलांनी एका लग्नमंडपाप्रमाणे सजविण्यात आले होते. याप्रसंगी वसंतपंचमीनिमित्त विठठलास आणि रूक्मिणीमातेस पांढरा शुभ्र वेष परिधान करण्यात आला होता.

  याप्रसंगी परंपरेप्रमाणे रूक्मिणीमातेच्या गर्भगृहातून गुलाल हा विठठलांच्या गभृगृहात नेण्यात आला. तेथे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ विजय देशमुख यांच्या शुभहस्ते सपत्नीक विधीवत पूजा करून विठठलांच्या अंगावर गुलाल उधळण्यात आला. त्यानंतर सदरचा गुलाल हा विठठलाकडून रूक्णीमातेकडे आणण्यात आला. याठिकाणी सदरचा गुलाल हा रूकिमणीमातेच्या अंगावरही उधळण्यात आला. त्यानंतर रूविमणीमातेची पूजा करून मुख्य विवाह सोहळयास सुरूवात झाली.

   साधारणपणे सकाळी साडे अकरांच्या सुमारास येथील सभामंडपामधे विठठलांची आणि रूक्मिणीमातेची अलंकाराने सजविलेली उत्सवमुर्ती आणण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. अनुराधा दिदि शेटे यांनी रूक्मिणी स्वयंवराचा शेवटचा अध्याय सांगण्यास सुरूवात केली. आणि याचवेळी विठठल रूक्मिणीच्या मूर्तीसमोर आंतरपाठ धरण्यात आला. आणि विठठलाचे आणि रूक्मिणीमातेचे लग्न हे मंगलाअष्टका म्हणून “ शुभमंगल सावधान ’’ असे म्हणत लावण्यात आले. यावेळी मंदिर समितीकडून आलेल्या सर्व भाविकांना अक्षता वाटण्यात आल्या होत्या. सदरच्या सर्व भाविकांनी मोठया प्रमाणावर सदरचा विवाह सोहळा झाल्यावर जल्लोष केला. यावेळी सनई चौघडेही लावण्यात आले होते. आणि याचवेळी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं अशा निनादात भजनही करण्यात आले.

यावेळी विठठलांच्या उत्सव मूर्तीस पांढरा शुभ्र वेष परिधान करण्यात आला होता. तसेच विठठलांस पुणेरी पगडीही परिधान करण्यात आली होती. यावर मोत्यांचे सुंदर असे अलंकार परिधान करण्यात आले होते. तर रूक्मिणीमातेसही रेशमी पैठणी नेसून डोक्यांपासून ते चरणापर्यत अलंकार परिधान करून सजविण्यात आले होते . तसेच यावेळी दोन्हीही उत्सवमूर्तीस मोत्यांच्या मंडवळया देखिल कपाळी लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे विठठल आणि रखुमाई हे साक्षात नव वधू – वर वाटत होते. यावेळी भगवंताचे दिसणारे सौदर्य हे अनेकांना भुरळ पांडणारे होते.

प्रतिवर्षी येथील श्री विठठल मंदिरात रूक्णीमातेचा विवाह सोहळा वसंत पंचमी दिवशी साजरा करण्यात येत असतो. यामधे सकाळच्या वेळेला विवाह सोहळा संपन्न होता. त्यानंतर दुपारी श्री विठठल रूक्मिणीच्या उत्सव मुर्तीची सवाद्य पंढरपूरात शहरातून मिरवणुक काढण्यात येते. यावेळी संपूर्ण मंदिर हे फ्ढgलांनी सजविण्यात येते. तर भगवंतावर पुष्पवृष्टी करण्यात येत असते. आजही दुपारी मोठया प्रमाणावर मिरवणुक ही काढण्यात आली. 

विठठलांची रंगपंचमी सुरू

वसंतपंचमीपासून ते रंगपंचमीपर्यत विठठलास पांढरा शुभ्र वेष परिधान करण्यात येत असतो. यावेळी वसंतपंचमीपासून ते रंगपंचमीपर्यत दररोज गुलालांची उधळण भगवंताच्या अंगावर केली जाते. आणि यातून सुमारे महीनाभर विठठलांची रंगपंचमी होत असते. याच रंगपंचमी उत्सवाचा शुभारंभही आज वसंतपचंमीच्या निमित्ताने झाला आहे. त्यामुळे आजपासून सावळा विठठलांचे रूप पांढ-या शुभ्र वेषात दिसणार आहे.

Related posts: