|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बंदर, रस्ता तरतुदीमुळे कोकण विकासाला चालना

बंदर, रस्ता तरतुदीमुळे कोकण विकासाला चालना 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

केंद्रीय अर्थसंकल्पात सामान्यांवर करसवलतींची फुंकर मारुन दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी कोकणसाठी वेगळी तरतूद स्पष्टपणे आढळत नाही. तथापि राष्ट्रीय महामार्ग विकास, सागरी महामार्ग आणि बंदर विकासासाठी भरीव तरतुद करण्यात आल्याचा लाभ कोकणाला मिळेल, अशी अपेक्षा तज्ञ व्यक्त करत आहेत. लोहमार्ग विकासासाठी भरीव तरतूद झाल्याने कोकण रेल्वे दुपदरीकरण अपेक्षेप्रमाणे गती घेईल, असेही मानण्यात येत आहे. कोकण रेल्वेविषयी नवी कोणतीही घोषणा अंदाजपत्रकात दिसून आली नाही.

  केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत आगामी आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक मांडले. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम तसेच बंदर विकास यासाठी मोठय़ा निधीची तरतूद केल्याचे म्हटले आहे. त्याचा लाभ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाला होईल. शिवाय राज्याच्या किनाऱयावरील बंदरांच्या विकासाला काही निधी मिळेल, असे तज्ञांना वाटत आहे. सागरी महामार्गासाठी या अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचा लाभही कोकणाला होण्याचे संकेत आहेत. दीर्घकाळ रखडलेल्या सागरी महामार्गाच्या पूर्ततेला यातून गती मिळण्याची शक्यता आहे.

  छोटय़ा उद्योगांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आल्याने रत्नागिरी व चिपळूण येथील औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योजकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. जिह्यातील निवडक उद्योगांना करकपातीचा लाभही मिळण्याची शक्यता आहे. देशातील 3500 किलोमीटरचे लोहमार्ग कार्यान्वित करण्याचे अर्थमंत्र्यांनी घोषित केल्याने त्याचा लाभ कोकण रेल्वे दुपदरीकरणाला होणे अपेक्षित मानले जात आहे. यापुढे प्रायोजित रेल्वे गाडय़ा तसेच स्थानकांचे बांधकाम करणारे प्रायोजक शोधण्यासाठी रेल्वेला मोकळीक देण्यात आली आहे. खासगीकरणातून असे विकास प्रकल्प कोकण रेल्वे देखील राबवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 उत्पादन खर्चाशी सुसंगत प्रवास भाडे ठेवण्यात येणार असल्याचे विधान अर्थमंत्र्यांनी पेले. सध्या तिकीट खर्चाच्या 58 टक्के एवढीच रक्कम प्रवाशांकडून वसूल केली जात आहे. पाच राज्यातील निवडणूक पार पडल्यावर रेल्वे प्रवासी भाडय़ात सुमारे 6-8 टक्के एवढी वाढ होईल, असे अर्थमंत्र्यांचे विधान सूचित करत असल्याचे तज्ञ म्हणत आहेत. चेअरकार किंवा स्लिपरसाठी ही भाडेवाढ होईल, असेही मानण्यात येत आहे. 10 हजार कोटी रुपयांची भांडवली तरतूद कर्जासाठी बँकांसाठी केली आहे. ती कोणत्या हेतूने केली आहे, ते पाहणे महत्वाचे ठरेल. सुरक्षेसाठी रेल्वेफंडाचा निर्णय घेण्यात आला. त्यात कोकण रेल्वेवरील सेवा समाविष्ट झाली आहे काय? या बद्दलचा खुलासा नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

 

Related posts: