|Friday, November 15, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » दुसरीपर्यंतचे शिक्षण अन् पगार मात्र दीड लाखांचा !

दुसरीपर्यंतचे शिक्षण अन् पगार मात्र दीड लाखांचा ! 

ऑनलाईन टीम / मुंबई :

असे म्हटले जाते की प्रत्येक पुरूषाच्या यशाच्या मागे महिलेचा हात असतो. हे खरे असून वैजापूर तालुक्यातील चाकेगावच्या शकुंतला घाटे या केवळ दुसरीपर्यंत शिकलेल्या असल्या तरी त्या आज उद्योजिका आहेत आणि त्या सध्या महिन्याला दीड लाखांचे उत्पन्न घेतात.

पतीच्या वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर शकुंतला यांनी दुचाकीचे स्पेअर पार्टस् बनवण्याचा कारखाना सुरू करण्याचे ठरवले. अत्यंत अडचणी, संघर्षानंतर ही जोखीम त्यांनी स्वीकारली. त्यांना सुरूवातीला नुकसान सहन करावे लागले, त्यामुळे त्यांची हिरमोड झाली. पण उद्योग यशस्वी करून दाखवायचेच, हे पती-पत्नीने ठरवले. त्यांनी घेतलेली रिस्क आज फळाला आली.

त्यामुळे ते आज दुचाकीच्या पाच प्रकारच्या ऍक्सलेटर पिन शॉकअप बुशच्या उत्पादनातून महिन्याला दीड लाख कमाई करत आहेत. घाटे दाम्पत्याने कसेतरी पैसे जमवून कारखाना सुरू केला आणि दीड वर्षातच दुसरी मशीन घेतली. भांडवल मिळाल्याने त्यांना मोठा आधार मिळाला. सध्या त्यांच्याकडे सात मशीन्स असून पाच महिला कामगार आहेत.

 

Related posts: