|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » तिसरीत शिकणाऱया मुलीच्या दप्तरात सापडले पिस्तुल

तिसरीत शिकणाऱया मुलीच्या दप्तरात सापडले पिस्तुल 

ऑनलाईन टीम / हिंगोली :

विद्यानिकेतन इंग्रजी शाळेतील इयत्ता तिसरीत शिकणाऱया मुलीकडे पिस्तूल सापडलयाने खळबळ उडाली आहे. रिसाला बाजार येथे वास्तव्यास असलेल्या या मुलीच्या दप्तरात पिस्तूल असल्याची माहिती समजताच शाळेचे प्रमुख गजेंद्र बियाणी यांनी शहर ठाण्याचे पीआय जगदीश भंडवार यांना माहिती दिली. त्यावरून सदर मुलगी व तिच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

हिंगोली शहर पोलिसांनी तात्काळ देशी कट्टा आणि काडतुस जप्त केली. मुलीचे वडिल सय्यद मुश्ताक आझम हे माजी सैनिक आहेत. परंतु त्यांनी बेकायदेशीरित्या कट्टा घरात ठेवलाच कसा, असा प्रश्न निर्माण होतो, त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 8 वर्षाच्या मुलीकडे शाळेत पिस्तुल सापडल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी हिंगोलीशहर पोलिस ठाण्यात सय्यद मुश्ताक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.