|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेणीवाड येथे आजपासून पंचकल्याण प्रतिष्ठापना महोत्सव

बेणीवाड येथे आजपासून पंचकल्याण प्रतिष्ठापना महोत्सव 

वार्ताहर /हुक्केरी :

बेणीवाड (ता. हुक्केरी) येथे शुक्रवार दि. 3 ते 7 फेब्रुवारीपर्यंत पंचकल्याण प्रतिष्ठाना महोत्सव कार्यक्रम मुनी 108 कुलरत्नभूषण मुनीमहाराज यांच्या दिव्य सानिध्यात होणार आहे.

नवव्या शतकात बेणीवाड येथे सुंदर अशी 1008 भगवान पार्श्वनाथची मूर्ती होती. त्यानंतर 12 व्या शतकात जैन समुदायांनी धर्मांतर केल्याने मूर्ती नष्ट झाली. मात्र आता धर्मस्थळच्या धर्मोस्थान ट्रस्ट यांच्या सहयोगाने मोडतोड झालेली बस्ती पुन्हा नवीन बांधण्यात आली आहे. पार्श्वनाथ मूर्तीला वज्रलेपीत करून प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे बेणीवाड गावात एकही जैन बांधव नसताना देखील भव्य परंपरेने पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव होत असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. महोत्सवाच्या अध्यक्षपदी युवा नेते महावीर निलजगी तर हुक्केरी, होसूर, यरनाळ, येल्लीमुन्नोळी, बस्तवाड, बेल्लद बागेवाडी, हुल्लोळी व इतर गावातून जैन बांधव मिळून महोत्सव साजरा करणार आहेत.

Related posts: