|Monday, September 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘चला हवा येऊ द्या’ची सुत्रे प्रियदर्शन जाधवकडे

‘चला हवा येऊ द्या’ची सुत्रे प्रियदर्शन जाधवकडे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मराठी लोकांच्या मनावर अधिराज्य करणारा आणि ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या माध्यमातून हसायला लावणारा डॉ. निलेश साबळे सध्या काही दिवस चला हवा येऊ द्या’ पासून दूर राहणार आहे. त्याची प्रकृती बिघडली असल्या कारणाने कमीतकमी महिनाभर तरी नीलेशला चित्रीकरणात सहभाग घेता येणार नसल्याने काही भागांपुरते शोचे सूत्रसंचलन अभिनेता प्रियदर्शन जाधवकडे देण्यात आले आहे.

गेले तीन वर्षे सातत्याने प्रेक्षकांसमोर अत्यंत रोमांचक पध्दतीने ‘चला हवा येऊ द्या’ हा शो डॉ.नीलेश साबळे आणि त्यांची टीम सादर करत आहे. या तीन वर्षांत पहिल्यांदाज काही भागांपुरता का होईना नीलेश शोपासून दुर असणार आहे. गेले काही दिवस त्याची प्रकृती बिघडलेली होती. त्याचे उपचार सुरू असले तरी डॉक्टरांनी काही आठवडे त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितली आहे. ‘टाईमपास 2’ फेम प्रियदर्शन जाधव स्वतःविनोदी अभिनेता, लेखक असल्याने त्याच्यावर काही भागांपुरते या शोचे सुत्रसंचलन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा शो पूर्णपणे नीलेशचा आहे. सध्या त्याची प्रकृती बरी नसल्याने मला काही भाग करण्यासाठी विचारणा झाली.